आरोग्यनामा ऑनलाईन- जर आपण कोठेतरी जाण्याचे ठरविले आणि अचानक आपल्या चेहऱ्यावर मुरुम(acne ) आले तर संपूर्ण मूड खराब होतो. संतुलित आहार आणि पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढवून मुरुमांपासून(acne ) आराम मिळवू शकतो. परंतु अशा उपायांमध्ये बराच वेळ जातो. काही घरगुती उपाय करून रातोरात मुरुम दूर करू शकतो.
१)कोरफड जेल
त्वचेच्या आरोग्यासाठी कोरफड ही सर्वात जास्त गुणकारी आहे. ही केवळ त्वचा मऊ करत नाही तर मुरुमांवर देखील फायदेशीर आहे. मुरुमांवर ताजे कोरफड जेल लावल्यास ते रातोरात अदृश्य होतात.
२) टी ट्री ऑयल
टी ट्री ऑयलमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात.टी ट्री ऑयलचे दोन थेंब नारळाच्या तेलात टाकून मिश्रण तयार करा. आणि ते मुरुमांवर लावा आणि थोड्या वेळाने ते कोमट पाण्याने धुवा.
३)ग्रीन टी
ग्रीन टी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पाण्यात ग्रीन टी टाकून गरम करा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते मुरुमांवर लावा. रात्रभर मुरुमांना ते कमी करते. ग्रीन टीचे अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म मुरुमांची सूज कमी करते.
४)मध
मुरुमांसाठी मध खूप फायदेशीर आहे. मध एंटीबैक्टीरियल आणि एंटीइंफ्लेमेटरी गुणधर्मानी समृध्द आहे. जो मुरुमांना जागीच कमी करतो. मुरुमावर एक-दोन थेंब मध लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवून टाका.
५)बर्फ
बर्फ मुरुम कमी करतो. बर्फाचा तुकडा एका स्वच्छ कपड्यात गुंडाळा आणि मुरुमांवर लावा. यामुळे मुरुमांमधील वेदना आणि सूज दूर होईल.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.