आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Acidity Bloating Constipation | मिठाई आणि पारंपारिक पदार्थ दिवाळीला आणखी आनंदी बनवतात. फराळाशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. मात्र हे पारंपारिक आणि तळलेले पदार्थ, मिठाई आपल्या आरोग्याचे नुकसान देखील करतात. हे पदार्थ अॅसिडिटी, ब्लॉटिंग (पोट फुगणे) आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढवतात. तुम्हाला असा त्रास होत असेल तर या 5 पद्धतीने तो दूर करू शकता. (Acidity Bloating Constipation)
1. गुलकंदचे पाणी-
फराळामुळे अॅसिडिटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा डोकेदुखी होत असेल तर एक चमचा गुलकंद एक ग्लास पाण्यात चांगले मिसळून प्या. यातील गुलाबाची पाने चावून खा.
2. सकाळची झोप –
सकाळच्या ब्रेकफास्टनंतर 15 ते 20 मिनिटाची झोपसुद्धा मोठा आराम देईल. यामुळे सकाळी पोट साफ होईल.
–
3. दुपारच्या जेवणात केळे खा –
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी एक केळे खा. न्यूट्रिशनिस्ट यास बद्धकोष्ठता दूर करण्याचा चांगला फार्म्युला मानतात.
4. दोन ते पाच मिनिटाचे सुप्तबद्ध कोणासन –
पोट फुगण्याची समस्या असेल तर 2 ते 5 मिनिटांचे सुप्तबद्ध कोणासन करा. यासाठी फरशीवर कमरेच्या बळावर झोपा. पाठीसाठी एक गोल उशी ठेवा. यानंतर गुडघ्यात पाय दुमडून दोन्ही पंजे जवळ आणून चिकटवा आणि जेवढे शक्य होईल ते पसरवण्याचा प्रयत्न करा.
5. तूपासह तांदळाची पेज –
तूपासह तांदळाच्या पेजचे सेवन करा. यासाठी तांदुळ भरपूर पाण्यात उकळवा. सूप प्रमाणे तयार करा. यानंतर एका कपात घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे तूप मिसळा. लवकरच पोटाची समस्या दूर होईल.
Web Title : Acidity Bloating Constipation | 5 best tips to getting rid of acidity bloating and constipation
Diwali 2021 | दिवाळीच्या रात्री आवश्य खा ‘ही’ एक गोष्ट; ‘प्रगती’-‘आनंदा’ला लागणार नाही कुणाची ‘नजर’
Diabetes | दिवाळीत ‘डायबिटीज’च्या रूग्णांनी ‘या’ 7 गोष्टींकडे ठेवा लक्ष, अन्यथा वाढेल ब्लड शुगर