‘उभे राहून पाणी पिणे’ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक लोकांना उभे राहून पाणी पिण्याची सवय असते. वेळ वाचवण्यासाठी किंवा कंटाळा म्हणून अनेकजण उभ्यानेच पाणी पितात. मात्र आयुर्वेदानुसार, उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक आहे. उभ्याने पाणी प्यायल्याने
होणारे आजार खालीलप्रमाणे –
सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते-
निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते. उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते.
सांधेदुखी-
उभ्याने आणि घाईघाईने पाणी प्यायल्यामुळे सर्वात जास्त परिणाम हा सांध्यावर होत असते. शरीराच्या सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे अचानक क्रॅम्प येणे किंवा सांधे दुखणे यांसारख्या व्याधी सुरु होतात.
किडनीचे विकार –
उभे राहून पाणी प्यायल्यास ते शरीरातून थेट वाहून जाते. किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होण्याची शक्यता वाढते. हा संसर्गामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा होऊ शकते.
जळजळीचा त्रास –
उभ्याने पाणी प्यायल्याने पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचून पोटात जळजळ होते.
अल्सर होण्याचा धोका –
उभे राहुल पाणी पिल्याने अन्ननलिकेच्या खालच्या भागावर परिणाम होतो. त्यामुळे छाती आणि हृदयात जळजळ होते तसेच अल्सर होण्याचा धोका वाढतो.