आरोग्यानामा ऑनलाईन टीम : चहा पिण्याची सवय वाईट, असे म्हटले जाते. दिवसभरात तीनपेक्षा जास्त कप चहा पिण्याची सवय असल्यास शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. यामुळे चहा कमी पिण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. परंतु, काही खास प्रकारचे चहा पिणे आरोग्यासाठी चांगले असते. तसेच रक्तगटानुसार हे चहाचे प्रकार घेतल्यास आरोग्यासाठी लाभदायक ठरते. रक्तगटानुसार कोणत्या प्रकारचा चहा घ्यावा, ते जाणून घेवूयात.
हा चहा तुमच्या फायद्याचा
१ ओ रक्तगट
या लोकांना अनेकदा पोटाच्या समस्या असतात. तणावातही असतात. तणाव कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी ओ रक्तगटवाल्यांनी आल्याचा चहा, ग्रीन टीचे सेवन करावे. दुधाच्या चहाचे सेवन कमी करावे.
२ ए रक्तगट
हे लोक प्रचंड मानसिक ताण घेतात. टेन्शन फ्री राहण्यासाठी त्यांनी ओव्याच्या चहाचे सेवन करावे. या चहामुळे उत्तम फायदे शरीरास मिळतात.
३ बी रक्तगट
यांनी ग्रीन टी, लेमन टी आणि तेजपत्त्याच्या चहाचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहते. पचनक्रियाही सुधारते.
४ एबी रक्तगट
यांना प्रचंड प्रमाणात झोप येते. यांनी चहा आणि कॉफीचे सेवन करू नये. याऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टीचे सेवन करावे.
Visit : arogyanama.com