आरोग्यानामा ऑनलाइन – आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट होतो. श्वासरोग नेहमी दूर राहतात. तसेच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. डोळे व आतड्यांची कार्यक्षमता वाढते. यकृत निरोगी राहिल्याने पचनशक्ती वाढते. अशा बहुपयोगी आवळ्याला आयुर्वेदातही खुप महत्व आहे. म्हणूनच त्रिफळा चूर्णात आवळ्याला विशेष स्थान आहे. आवळा रक्तशुद्धीकरण, रक्ताभिसरणातही गुणकारी असून विर्याचा स्रोत आहे. बहुगुणी आवळ्याचे आणी काही खास फायदे आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत फायदे
१ नियमीत आवळा खाल्ल्यास शारीरिक व मानसिक थकवा दूर होतो. उत्साह व स्फूर्ती वाढते.
२ सुकेलेल आवळे तसेच धने समप्रमाणात घेऊन रात्री मातीच्या भांड्यात भिजत ठेवावे. सकाळी ते पाणी गाळून त्यात खडीसाखर मिसळून प्यावे. यामुळे लघवीची जळजळ थांबते. मुत्ररोगांमध्ये लाभ होतो.
३ पंधरा ते वीस मि.ली. आवळ्याचा रस तसेच एक चमचा मध मिसळून त्याचे चाटण घेतल्यास दृष्टी तीक्ष्ण होते. आवळ्याचा रस आणि शुद्ध मध समप्रमाणात घेऊन मिसळावे. या मिश्रणाचे दररोज रात्री डोळ्यांना अंजन केल्यास डोळ्यांचा अंधुकपणा जातो.
४ तरुणावस्थेपासूनच नियमीतपणे आवळ्याचे सेवन केल्यास तरुणावस्था दीर्घकाळ टिकते.
५ आवळ्यामुळे गर्भवती स्त्रीच्या शरीराचे उत्तम पोषण होते. मलावरोधाचा त्रास कमी होतो.
६ आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर घेतल्यास डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.
७ मलावरोधाचा त्रास असल्यास नियमीतपण आवळ्याचा रस अथवा आवळा खावा. यामुळे पोट साफ होते.
८ सर्दी किंवा कफाचा त्रास असेल तर आवळ्याच्या १०-२० मि.ली. रसात १ ग्रॅम चूर्णात पाव चमचा हळद टाकून घ्यावे.
९ एक-दोन आवळे आणि १०-२० ग्रॅम काळे तीळ रोज सकाळी चावून खाल्याने स्मरणशक्ती वाढते.आवळ्याचा रस कोरफडसह प्यायल्याने पित्ताचे शमन होते.
१० जो मनुष्य १० ते १५ मि.ली. आवळ्याचा रस, १० ते १५ ग्रॅम मध, १० ते १५ ग्रॅम खडीसाखर, २० ग्रॅम तूप मिसळून त्याचे चाटण घेतल्यास तारूण्यवस्था जास्तकाळ टिकते.