आरोग्यानामा ऑनलाइन – आयुर्वेदात आवळा या फळाला खुप महत्व आहे. या फळाचे नियमित सेवन केल्यास बुद्धी, स्मृर्ती तसेच ज्ञानेंदियांची कार्यशक्ती वाढते. आवळा आयुष्यवर्धक तसेच सात्विक वृत्ती जागृत करून ओज कांती वाढविणारा आहे. आवळा हे फळ हिवाळ्यामध्ये येत असले तरी त्यापासून मुरंबा तयार करून तो वापरता येतो. आवळा नियमित सेवन केल्यास जीवनशक्ती प्रचंड वाढते. याच फळाचे आणखीही काही फायदे आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत फायदे
१ आवळा सेंधेमीठासह खाल्यास षडरसयुक्त आहाराचे फायदे मिळतात.
२ रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे, मानसिक तणाव, अनिद्रा यांसारख्या व्याधींमध्ये २० ग्रॅम गाजराच्या रसात ४० ग्रॅम आवळ्याचा रस मिसळून सेवन करावा.
३ दोन चमचे आवळ्याचा रस आणि दोन चमचे कच्च्या हळदीचा रस मधासोबत घेतल्याने प्रमेह दूर होतो. काही दिवस हा प्रयोग केल्याने मधुमेह नियंत्रणात येतो. सर्व प्रकारच्या मुत्रसंबंधी व्याधींपासून सुटका होते.
४ केस काळे ठेवणे तसेच केसातील कोंडा दू करण्यासाठी आवळा उपयुक्त आहे.
५ सकाळी आवळ्याचा मुरंबा खाल्याने पोट साफ राहते. शरीरातील सुस्ती व अशक्तपणा दूर होतो. मधुमेहाच्य रुग्णांनी नियमित मुरंबा खावा.
६ आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने हिरड्यांतून, नाकातून रक्त येणे अशा समस्या दूर होतात.
७ नियमीत आवळा खाल्याने त्वचेची कांती सुधारते. तसेच त्वचेशी संबंधीत आजार होत नाहीत.
८ आवळ्याच्या नियमीत सेवनाने बुद्धी, स्मृर्ती तसेच ज्ञानेंदियांची कार्यशक्ती वाढते.
९ आवळ्याचा रस हळदीसोबत घेतल्यास मधूमेह नियंत्रणात राहतो.
१० हात, पाय, तळव्याची आग तसेच सर्वांगाची आग होत असल्यास आवळ्याचा रस मधासह घ्यावा.