आरोग्यनामा ऑनलाइन टीम – येल आणि विस्कॉन्सिन यांनी ११९३ मध्ये अ जीवनसत्त्वाचा शोध लावला. शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागणारे सेंद्रिय घटक म्हणजे जीवनसत्त्वे होय. याचे अ, ब, क, ड, इ, के असे विविध प्रकार असून यापैकी अ जीवनसत्त्व अतिशय महत्त्वाचे आहे. डोळे व त्वचा यांच्या आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. प्रौढ स्त्री-पुरुषांना दररोज ६०० माईक्रोग्रॅम तर शिशूंना ३५० मायक्रोग्रॅम इतके अ जीवनसत्त्व लागते. स्तनदा मातांना दररोज ९०० मायक्रोग्रॅम इतके अ जीवनसत्त्व आवश्यक असते.
‘अ’ जीवनसत्व कोठून मिळते
* प्राण्यांचे यकृत व माशांच्या यकृताचे तेल
* हिरव्या पालेभाज्या या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व-अ भरपूर असते.
* पपई, आंबा, लालभोपळा, गाजर, शेवग्याची पाने व शेंगा यातही असते.
कमतरतेची ‘ही’ आहेत लक्षणे
* रातांधळेपणा येतो
* डोळ्यातील आवरण व नेत्रपटल कोरडे होणे
* डोळ्यात पांढुरके डाग दिसणे
* उपचार न झाल्यास अंधत्वही येऊ शकते
भारतात ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ६ मुलांमध्ये या जीवनसत्त्वाचा अभाव आढळून येतो. या जीवनसत्त्वाचा यकृतात साठा केला जातो. सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये जीवनसत्त्व-अ चे डोस मोफत दिले जातात. ६ महिने ते ६ वर्ष या वयोगटात दर सहा महिन्याला दोन लाख आंतरराष्ट्रीय एकके एवढे जीवनसत्त्व-अ देतात. जीवनसत्त्व-अ साठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे.