आरोग्यनामा ऑनलाइन – सौंदर्य आणि आहार यांचा खुप निकटचा संबंध आहे. परंतु, हेच अनेक महिलांना माहित नसल्याने त्या आहाराकडे दुर्लक्ष करून केवळ विविध सौंदर्यवृद्धीसाठी उपाय करत असतात. यामुळे अनेकदा या उपायांचा परिणाम दिसून येत नाही. सुंदर त्वचेसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक आहे. जर सौंदर्य वाढवायचे असेल आणि दिर्घकाळ टिकवायचे असेल तर कोणता आहार घ्यावा, याविषयी आपण जाणून घेवूयात.
द्रवरूप आहार
शरीरातील विषाक्त पदार्थ काढण्यासाठी पाणी खुप उपयोगी आहे. यासाठी हर्बल टी, सूप, फळ आणि भाज्यांचा ज्यूस पिणे लाभदायक ठरते. यामुळे त्वचा उजळते तसेच सुंदरही होते. दिवसभर नियमितपणे कमीत कमी दीड लिटर पाणी प्यायला पाहिजे.
पौष्टिक सलाड
उजळ त्वचेसाठी हिरव्या सलाडचा आहारात समावेश करावा. यातील बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई तसेच त्वचा निरोगी राखणारे अँटिऑक्सिडंट्स असतात. अॅव्होकॅडोतील व्हिटॅमिन ई सौंदर्य वाढवते.
भरपूर प्रोटीन
आहारात नियमितपणे प्रोटीन घ्यावे. यासाठी पांढरे मटण, मासे, अंडी, दूध, दही, पनीर, सोयाबीन आणि डाळींचा आहारात समावेश करा. यामुळे त्वचेच्या पेशींच्या निर्मितीमध्ये वाढ होते.
व्हिटॅमिन सी
त्वचेचा लवचिकपणा आणि कोलोजन सुधारण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असते. याचा आहारात नियमितपणे समावेश करावा. यासाठी लिंबू, आवळा, संत्री, मोड आलेली डाळ आणि हिरव्या मिरचीचे सेवन करावे.
फळे
पपई, कलिंगड, खरबूज, पेरू, आलुबुखारा, जांभूळ, लिची इत्यादी बिया असलेली फळे त्वचेसाठी लाभदायक आहेत. ही फळे त्वचेला भरपूर पोषण देतात. यामधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशी नष्ट होऊ देत नाहीत.
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई आणि झिंक रुक्ष त्वचेला उजळपणा आणि चमक प्रदान करते. हे व्हिटॅमिन सी फूड, अॅव्होकॅडो, मेवा, राजमा, फ्लेक्स सीड, सोयाबीन, लोबिया मध्ये असते. ओमेगा-३ फॅट्स फक्त ऑयली सॉलमन माशांमध्ये आढळून येते.
आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे
शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
२ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत