आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मधुमेह हा आजार नियंत्रणाबाहेर गेल्यास त्याचे अतिशय गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरातील विविध अवयवांसाठी ते धोकादायक ठरू शकते. यासाठी मधुमेह नेहमी नियंत्रणात ठेवणे खुप आवश्यक असते. मधुमेहावर दुध गुणकारी असल्याचे काही तज्ज्ञ सांगातात. हे प्यायल्याने तत्काळ उर्जा मिळते. रात्री दूध पिण्याचे कोणते फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
डोळ्यांसाठी लाभदायक
दुधामध्ये व्हिटॅमिन-ए असल्याने डोळ्यांची शक्ती टिकते.
अॅनिमिया
दुधातील आयर्न रक्ताची कमतरता दूर करण्यात मदत करते.
संधिवात
यामध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. हे संधिवात टाळण्यात मदत करते.
स्नायू मजबूत
दुधातील प्रोटीनमुळे स्नायू मजबूत राहतात.
कॅन्सर
यामधील लिनोलिक अॅसिड कॅन्सर टाळण्यात मदत करतात.
हृदयाच्या तक्रारी
दूध प्यायल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि हृदयाच्या अनेक तक्रारींपासून आपली सुटका होते.
दात मजबूत
यामध्ये फॉस्फरस असते, ज्यामुळे दात मजबूत होतात आणि गम प्रॉब्लेमपासून आराम मिळतो.
त्वचा उजळते
शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो. त्याने त्वचेचा उजळपणाही वाढतो.
मधुमेह
दूध प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहाचा धोकाही कमी होतो.
कमजोरी
यातील रायबोफ्लेविनमुळे कमजोरी दूर होते आणि भरपूर एनर्जी मिळते.