‘त्या’ जोडप्याने लग्नाच्या वाढदिवशी केला अवयवदानाचा संकल्प
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कोल्हापूरमधील शिरोळ येथील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते खंडेराव पार्वतीशंकर हेरवाडे व त्यांची पत्नी अलका हेरवाडे यांनी त्यांच्या ३५व्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्रदान, रक्तदान, देहदान आणि अवयवदान चळवळीला प्रोत्साहन देऊन आपल्या अवयवदानाचा फॉर्म भरुन एक आगळा-वेगळा वाढदिवस साजरा केला.
यावेळी नगरसेविका जयश्री धर्माधिकारी म्हणाल्या, या दांपत्यांनी समाजात एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. २१ व्या शतकात आजच्या धावत्या युगात अवयव दानाची गरज ओळखून शिरोळमध्ये प्रथमच हेरवाडे दांपत्याचा मरणोतर अवयव दान हा उपक्रम समाज उपयुक्त आणि मानवी जीवनाचे सार्थक करणारा असल्याचे सांगितले. यावेळी प्रसाद धर्माधिकारी, नेताजी जाधव, सदाशिव गावडे, विजय देशमुख, सुभाष माळी, रवी पाटील उपस्थित होते.