आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हार्ट अटॅक हा अतिशय गंभीर प्रकार असतो. हार्ट अटॅकच्या बाबतीत जवळपास ४५ टक्के केसेस या सायलेंट हार्ट अटॅकच्या असतात. कोणताही हृदयरोग नसतानाही सायलेंट हार्ट अटॅक होऊ शकतो. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही समस्या होण्याचे प्रकार जास्त घडत असतात, असे तज्ज्ञ सांगतात.
सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?
सायलेंट हार्ट अटॅकला सायलेंट मायोकार्डियल इन्फ्रेक्शन (एसएमआय) असे म्हटले जाते. यात व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यावर वेदना होत नाहीत. हार्ट अटॅक आला हेसुध्दा कळत नाही. याचे वेगळे संकेत असतात.
वेदना होत नाहीत
मेंदुपर्यंत वेदना पोहोचवत असलेल्या धमण्या किंवा स्पाइनल कॉर्डमध्ये समस्या असल्यामुळे किंवा सायकोलॉजिकल कारणामुळे व्यक्तिला वेदनेची जाणिव होत नाही. जास्त वय किंवा मधुमेहाच्या रूग्णामध्ये ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमुळे वेदनेची जाणिव होत नाही.
ही आहेत लक्षणे
१ गॅस्ट्रिक प्रॉब्लेम, पोट खराब होणे.
२ विनाकारण सुस्ती, कमजोरी.
३ थोडीशी मेहनत केल्यास थकवा येणे.
४ अचानक थंड घाम येणे.
५ वारंवार श्वास फुगणे.
ही आहेत कारणे
१ जास्त ऑयली, फॅटी आणि प्रोसेस्ड् फूड खाणे.
२ व्यायामाचा अभाव.
३ दारू आणि सिगारेट पिणे.
४ मानसिक ताण, तणाव.
हे आहेत उपाय
१ डाएटमध्ये व्हेजिटेबल, सलाडचा समावेश करा.
२ नियमित व्यायाम, योगा करा. वॉक करा.
३ सिगारेट, दारूपासून लांब रहा.
४ आनंदी रहा. मानसिक ताण-तणाव घेऊ नका.
५ नियमित मेडिकल चेकअप करा.