दुर्मिळ आनुवंशिक आजाराचा शोध घेईल ॲप
आरोग्यनामा ऑनलाईन टीम- शास्त्रज्ञांनी एक नवीन स्मार्टफोन ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या मदतीने एक दुर्मिळ अनुवांशिक आजाराची प्रारंभिक अवस्थेतच ओळख केली जाऊ शकते. लिथुआनियातील काउनस विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ‘न्यूरल इम्पेमेंट टेस्ट सुएट’ नावाचे हे ॲप विकसित आहे.
हे ॲप आपल्या यूजरला हंटिंगटन नावाच्या अनुवांशिक आजाराचा शोध घेण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या उपलब्ध करून देते. या आजाराचे निदान झाल्यानंतर ‘न्यूरल इम्पेमेंट टेस्ट सुएट ॲप’ यूजरला चिकित्सा व्यावसायिकांसोबत संपर्क करण्यासाठी प्रेरित करते. हंटिंगटन एक दुर्मिळ अनुवांशिक आजार असून त्यामध्ये रुग्णाच्या शारीरिक हालचाली अनियंत्रित होतात. सोबतच भावनात्मक समस्या आणि विचार करण्याची क्षमता कमजोर होते. हे ॲप खासकरून वृद्ध लोकांसाठी अतिशय सहाय्यक बनू शकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.