रंग
सफेद अंड्याच्या तुलनेत भूरके अंडे जास्त फायदेशीर असते, असा काहींचा समज असतो. परंतु, तो चूकीचा आहे. अंड्याच्या रंगाने त्याच्या पौष्टीक तत्वांवर फरक पडत नाही. दोन्ही रंगाच्या अंड्यात समान प्रमाणात पोषकतत्त्व असतात.
फॅट
एका मोठ्या अंड्यात १.५ ग्राम सॅचुरेटेड फॅट, १.८ ग्राम मोनोसॅचुरेटेड आणि एक ग्राम पॉलीअनसॅचुरेटेड फॅट असते. १८५ मिग्रा कोलेस्टेरॉल असते. रोज एक अंडे खाल्ले तर कोलेस्टेरॉलची गरज पुर्ण होते. तसेच हृदयरोग होणार नाही.
ताजे अंडे
अंड्याचीसुद्धा एक्सपायरी डेट असते, फार्ममधून बाहेर आल्यानंतर तीन आठवड्याच्या आत अंडे खाणे फायदेशीर असते. तसेच अंडे जास्त प्रमाणात उष्ण तापमानात ठेवले तर त्यातील पौष्टीकता संपते. यामुळे नेहमी ताजे अंडे खावे.
एनर्जी बूस्टर
अंडे हे एक खुप चांगले एनर्जी बूस्टर असून रोज सकाळी झोपेतून उठताना आळस येत असेल तर अंडे खाणे फायदेशीर आहे. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते. याच्या पिवळ्या भागात हेल्दी फॅट्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात.
वजन
वजन संतुलित ठेवण्यासाठी अंडे खुप फायदेशीर असून यामुळे भुक शांत होते आणि ओव्हर ईटिंगपासून बचाव होतो. वजन कमी करायचे असेल तर अंड्याचे सेवन करावे.
व्हीटॅमिन डी
कॅल्शियम सोबतच व्हीटॅमिन डी सुध्दा हाडांना मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. शरीराला सुर्याच्या किरणांपासून आणि आहारामधून व्हीटॅमिन डी मिळते. अंड्यांमध्येसुध्दा व्हीटॅमिन डी असते, ते हाडांना मजबूत बनवते.
अंड्याचा आकार
अंड्याचा आकार एकाच प्रकारचा नसतो, विविध आकारांचे अंडे असते. लहान, मोठे आणि मध्यम अशा तीन प्रकारचे असते.
पौष्टिकतत्व
अंड्यातील कोलेस्टेरॉल हे हृदयाला हानिकारक असले तरी ४० पेक्षा जास्त संशोधनात सिध्द झाले आहे की, अंडे एक आरोग्यवर्धक आहार आहे. यामध्ये व्हीटॅमिन ए, डी, बी१२ सोबतच रिबाफ्लेविन, फास्फोरस आणि फोलेट असते. हे सर्व पौष्टीकतत्वे शरीरासाठी फायदेशीर असते यामुळे मेंदू मजबूत होतो आणि डोळ्यांची शक्ती वाढते.
प्रोटीन
अंड्याच्या आतील सफेद भागात अल्ब्यूमिन नावाचे प्रोटीन असते. सकाळच्या वेळी शरीरीला प्रोटीनची आवश्यकता असते, यासाठी रोज सकाळी अंडी खाल्याने शरीराला फायदा होईल.