पहाटे-पहाटे ‘या’ 9 गोष्टी करूच नका, होतील गंभीर दुष्परिणाम, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पहाटे लवकर उठणे हे आरोग्यासाठी चांगले आहे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पहाटे उठून स्नानादीकर्म आटोपल्यास दिवसभर मन आणि शरीरात उत्साह संचारतो. आरोग्यदेखील चांगले राहते. परंतु, पहाटे झोपेतून उठल्या-उठल्या काही चुकीच्या गोष्टी केल्यास त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम सुद्धा होऊ शकतात. यासाठी पहाटे उठल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
या गोष्टी टाळा
लगेच व्यायाम टाळा
उठल्या उठल्या जिममध्ये जाऊ नका. तसेच व्यायामाचे साहित्य बेडरुममध्ये ठेवू नका. बेडवरून उठून थेट व्यायाम करू नका. झोपेत शरीर सैल झालेले असते. अचानक जर त्याच्यावर ताण पडला तर शरीराला दुखापत होते. त्यामुळे झोपेतून उठल्या उठल्या जिममध्ये जाऊ नये. १० ते १५ मिनिट शरिराला वेळ द्यावा. बेडवरच हलकासा व्यायाम करा.
अलार्मचा आवाज
पहाटे लवकर उठण्यासाठी अनेकजण आलार्म लावतात. परंतु, अलार्मचा आवाज कर्णकर्कश असल्याने ध्वनिप्रदूषण होते. शिवाय, अचानक झालेल्या आवाजामुळे कधीकधी खडबडून जाग येते. याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हृदयविकार असल्यास कर्णकर्कश आवाजाच्या अर्लामचा मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे अर्लाम सुमधूर आवाजाचा लावा.
ब्रेकफास्ट
रात्री झोपल्याने पोटात सलग ८ ते ९ तास काहीही नसते. अशा वेळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर हलका आहार घेतला पाहिजे. पण, अनेकजण काहीही ब्रेकफास्ट न करता थेट चहा घेतात. हे प्रकृतीसाठी घातक आहे.
मल, मूत्र रोखून धरू नका
काही जण सकाळी मल-मूत्र रोखून धरतात. हा प्रकार महिलांमध्ये जास्त असतो. मुलांना शाळेच्या वेळेपूर्वी तयार करणे, डब्बा करणे यासाठी त्यांची धावपळ होते. वेळ महिला वेळ वाचवण्यासाठी टॉयलेटला जाण्याचे त्या टाळतात. यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.
स्मोकिंग
सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटाने स्मोकिंग करणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे कँसरचा धोका कैकपट वाढतो.
चिडचीड, वाद
सकाळी-सकाळी चिडचीड केल्याने त्याचा मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे चिडचीड करण्याचे टाळावे.
अल्कोहल
झोपेतून उठल्या उठल्या चुकूनही रिकाम्या पोटाने अल्कोहल सेवन करू नका. त्याचा लिव्हरवर थेट परिणाम होतो.
टीव्ही पाहू नका
झोपेतून उठल्यानंतर एकदम टीव्ही पाहू नका. त्यामुळे सुस्ती वाढते आणि दिवस खराब होतो.
ही सवय टाळा
काहींना शांत झोप झाल्यानंतरही अंथरुणात पडून राहण्याची सवय असते. पण, हे आरोग्यासाठी घातक आहे.
Comments are closed.