आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अलिकडे स्मार्टफोनचा वापर करणारांची संख्या खुपच वाढली आहे. अनेकजण दिवसरात्र स्मार्टफोन आपल्या जवळ बाळगत असल्याने त्याचे विविध दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. रात्री झोपतानाही बहुतांश लोक स्मार्टफोन वापरतात. अशाप्रकारे अंधारात स्मार्टफोनचा वापर केल्याने डोळे आणि मेंदूवर वाईट प्रभाव पडत आहे. अंधारात स्मार्टफोनचा वापर केल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो, असे संशोधनात आढळून आले आहे. अंधारात स्मार्टफोनचा वापर केल्याने कोणते ९ साइड इफेक्ट्स होतात, त्याची माहिती आपण घेणार आहोत.
हे परिणाम होतात
१ मेंदूवर परिणाम होऊन ग्लूकोमाची समस्या होऊ शकते
२ फोकसिंग मसल्सवर परिणाम झाल्याने कोणत्याही वस्तूवर नजर रोखता येत नाही
३ डोळे लाल होण्याची समस्या होते
४ डोळ्यावर सतत ताण पडल्याने डार्क सर्कलची समस्या होते
५ रेटीनावर वाईट प्रभाव पडल्याने दृष्टी कमी होते
६ मेलाटोनिन हार्मोन्स कमी झाल्याने निद्रानाशाची समस्या होते
७ मानसिक तणाव वाढतो
८ दिर्घकाळ अशापद्धतीने वापरल्याने ब्रेनट्यूमर होऊ शकतो
९ झोप पूर्ण न झाल्याने थकवा जाणवतो
फक्त ३० मिनिटे स्मार्टफोनच्या स्क्रीनवर काम केले तरी यामुळे डोळे कोरडे होतात. त्यामुळे रेटिनावर वाईट प्रभाव पडतो. दिर्घकाळ असेच राहिल्याने दृष्टी कमी होऊ शकते. योग्य वेळी सावधगिरी बाळगली नाही तर डोळे आणि शरीराच्या इतर भागांवरही वाईट प्रभाव पडू शकतो.