आरोग्यनामा ऑनलाइन – ब्रेड हा अनेकांचा आवडता पदार्थ असतो. काहीजण चपती, भाकरीऐवजी नियमित ब्रेड खातात. तसेच ब्रेडचा वापर करून विविध पदार्थही तयार केले जातात. या व्हाइट ब्रेडमध्ये आरोग्याला अपायकारक असे अनेक घातक पदार्थ असतात, असे सेंटर फॉर सायंस अँड एन्वायरमेंटच्या अहवालात म्हटले आहे. ब्रेडमध्ये कोणते घातक घटक असतात, याविषयी माहिती घेवूयात.
हे आहेत धोके
१ व्हाइट ब्रेडमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट जास्त असते. ज्यामुळे शरीरात सीबम तयार होते, यामुळे सौंदर्याच्या समस्या होतात.
२ यामध्ये पोटॅशियम आयोडेटचे प्रमाण जास्त असते. जास्त खाल्ल्याने उलटी, पोटदुखी होऊ शकते.
३ ब्रेडमध्ये शुगरचे प्रमाण जास्त असते. जे जास्त ब्रेड खातात, त्यांचे वजन जलद वाढते.
४ ब्रेडमध्ये ग्लुटेनचे प्रमाण अधिक असते. पोट खराब होते. पचनासंबंधी अनेक समस्या होतात.
५ यात पोटॅशियम ब्रोमेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे कँसर होऊ शकतो.
६ यात स्टार्चचे प्रमाण जास्त असते, यामुळे दात खराब होऊ शकतात.
७ व्हाइट ब्रेडमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि फायबर नसते. यामध्ये सोडियम जास्त असते. यामुळे हार्ट प्रॉब्लेम वाढू शकतात.
८ बहुतांश ब्रेड हे मैद्याने तयार केले जातात. यामुळ ते लवकर पचन होत नाहीत. यामुळे पेप्टिक अल्सर अथवा लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता असते.
९ यात कार्बोहायड्रेट्स जास्त असते. हे डायबिटीज आणि हार्ट अटॅकची शक्यता वाढवते.