आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वैवाहिक जीवनात रोमान्स कायम ठेवण्यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या गरजा लक्षात घेऊन वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद घेतला पाहिजे. काही वेळा महिलांकडून प्रेम प्रसंगाच्यावेळी नकळत काही चुका होतात. याचे परिणाम त्यांना माहित नसतात. परंतु, या चुकांचा परिणाम पुरुषांवर होऊ शकतो. बदललेल्या जीवनशैलीचाही सेक्स लाइफवर परिणाम होत आहे. यासाठी महिलांनी काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
ही काळजी घ्या
* धावपळीच्या जीवनात अनेकदा मानसिक ताणतणाव असतो. परंतु, त्यावर मात करता आली पाहिजे. मूड नसल्याचे कारण सांगून जोडीदाराला नाराज करू नका. कारण मूड नाही ही गोष्ट नात्यामध्ये कायम राहिली तर याचा वाईट प्रभाव पडू शकतो. यामुळे मूड खराब आहे, आज मूडच नाही या गोष्टी वारंवार घडू देऊ नका. मूड बदलून प्रणयाचा भरपूर आनंद घ्या.
* प्रणयकाळात पत्नीला काय हवे, हे पतीला कधीकधी समजू शकत नाही, कारण पत्नी मोकळ्यामनाने याविषयी चर्चा करत नाही. यामुळे सेक्सुअल लाइफ प्रभावित होऊ शकते. यासाठी मनातील बोला.
* प्रेम आणि नात्याच्या मजबुतीसाठी संवाद गरजेचा आहे. यामुळे गप्प राहू नका, मनमोकळ्या गप्पा मारा आणि प्रणयाचा आनंद घ्या.
* सेक्समध्ये केवळ पतीने संतुष्ट राहणे हे चुकीचे आहे. पत्नीनेसुद्धा प्रणयाचा पूर्ण आनंद घेणे आवश्यक आहे.
* महिलांप्रमाणे पतीलाही वाटते की पत्निला पूर्ण संतुष्टी मिळावी. यामुळे प्रणय काळात पतीकडून काही कमतरता असेल तर त्यांना सांगावे यामुळे ती कमतरता दूर होऊ शकते.
* अनेकदा असे दिसून येते की, प्रणयाची इच्छा प्रथम पती व्यक्त करतो, पत्नी करत नाही. म्हणजे, प्रणय करण्याची इच्छा नेहमी फक्त पतीची असते, असे दिसून येते. नेहमी पती इच्छा व्यक्त करत असेलही, परंतु कधीकधी पत्नीनेही पतीच्या आधी ही इच्छा व्यक्त करण्यास हरकत नाही.
* जसा-जसा काळ उलटत जातो, सेक्सला बहुतांश महिला एक काम समजू लागतात. त्यांना वाटते की, एकदाचे लवकर हे काम संपावे. पत्नीची अशाप्रकारची वागणूक पतीला दुःखी करू शकते.
* प्रणय काळात महिला स्वतःमधील उत्साह दाबून ठेवतात, त्यांना भीती असते की, पतीला काही चुकीचे वाटेल. तुमची ही भीती त्यांना असे दर्शवते की, तुम्ही फक्त औपचारिकता पार पाडत आहात. यासाठी पूर्ण उत्साहाने पार्टनरला साथ द्यावी.
* प्रणय काळात अनेक महिला पतीला काही नियमांमध्ये बांधून ठेवतात. उदाहरणार्थ लाईट बंद करणे, वेळे पाहा इत्यादी. महिलांच्या अशा बंधनांमुळे पतीचा मूड खराब होतो.
* सेक्सुअल लाइफमध्ये पतीला थोडासा बदल करावासा वाटला तर पत्नी व्यर्थ बदल समजून दुर्लक्ष करते. पतीला सेक्सुअल लाइफमध्ये बदल करण्याची इच्छा असेल तर तो बदल करू द्या. कारण एकसारख्या सेक्स लाइफमुळे ते बोर होतात. यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती अवलंबवावी.