आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जेवणात मोहरी आवर्जून वापरली जाते. त्यामुळे भारतात प्रत्येक स्वयंपाकघरात मोहरी असतेच. ब्रासिका नाईग्र असे मोहरीचे वनस्पतिक नाव आहे. मोहरीचा वापर मसाल्याच्या स्वरूपात तसेच अनेक हर्बल उपायांसाठी केला जातो. मोहरीचा वापर औषध म्हणून कसा करावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
असे करा उपाय
* संधीवात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. संधीवात आणि सांधेदुखीचा त्रास होत असेल तर, मोहरीच्या बीयांचा लेप आणि कपूर एकत्र करून मालिश केल्यास आराम मिळतो.
* मोहरीची पेस्ट डोक्याला लावल्यास फोड, पुरळ आणि केसांचे गळणे कमी होते. असे केल्याने केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते.
* मायग्रेनचा त्रास असल्यास मोहरी बारीक करून दुखत असलेल्या भागावर लावल्यास तत्काळ आराम मिळतो.
* सिगरेटमुळे होठ काळे झाले असल्यास अक्कलकाढा आणि मोहरी समान प्रमाणात बारीक करून दिवसातून ३ ते ४ वेळेस होठांवर लावल्यास काळेपणा कमी होण्यास मदत होते.
* कान दुखत असल्यास मोहरीच्या तेलाचे २ ते ३ थेंब कानात टाकल्यास त्रास कमी होतो. ज्या व्यक्तींना कमी ऐकू येते अथवा ऐकूच येत नाही अशा व्यक्तींनी या तेलाचा उपयोग केल्यास फायदा होतो.
* मोहरीच्या बीपासून तयार करण्यात आलेला लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखीच्या त्रासापासून तत्काळ आराम मिळण्यास मदत होते. काही आदिवासी भागांमध्ये या लेपामध्ये कापूर देखील मिसळला जातो.
* मोहरीच्या बीमध्ये मायरोसीन, सिनिग्रिन यासारखे रसायन उपलब्ध असतात. हे रसायन त्वचा रोगांसाठीदेखील उपयोगी मानले जातात. रात्री पाण्यात मोहरी भिजत ठेवून हे पाणी सकाळी त्वचेवर लावल्यास त्वचा रोगांपासून आराम मिळण्यास मदत होते.
* मुलगा रात्री अंथरूणात लघवी करत असेल तर, चिमुटभर मोहरीचे चूर्ण पाण्यात मिसळून प्यायला दिल्याने अंथरूणात लघवी करणे बंद होण्यास मदत होते.
* हलक्या गरम पाण्यात मोहरी टाकून हे पाणी प्यायल्याने जुलाबाचा त्रास कमी होण्यास मदत होते.