कोरडे आणि खराब केस
हातावर दुध घेऊन केसांना मुळापासून लावा. दहा मिनिटे थांबून केस धुवून घ्या.
कंडिशनिंग
मुलायम केस
दुध, मध, अंड्याचा बलक एकत्र करून केसांना लावा. गरम टॉवेलने गुंडाळून ठेवा. वीस मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.
केसगळती
बकरीच्या ताज्या दुधाने केस धुतल्यास केस मजबूत होतात. केस गळती थांबते.
काळे, दाट केस
कच्च्या दुधाने केसांना मुळापासून मालिश करा. केस काळे आणि दाट होतात.
केसांची वाढ
ताज्या दुधाने केसांची मॉलिश केल्याने केसांची वाढ चांगली होते. तसेच यासाठी दुध प्यावे.
तेलकट केस
दुधात थोडेसे बेसन पीठ टाकून हे पातळ मिश्रण केसांना चांगले लावा. दहा मिनिटानंतर केस धुवून टाका.
कोंडा
दुधात काळीमिरी पावडर टाकून केसांना लावा. दहा मिनिटांनी केस धुवून घ्या.