जीभ शरीरातील सर्वात मजबूत मांसपेशी, जाणून घ्या इतर ९ फॅक्ट्स

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – जीभेसंबंधीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत. जीभ हा तोंडाचा महत्त्वाचा भाग असूनही आपण दातांच्या तुलनेत जीभेकडे खुप कमी लक्ष देतो. जीभेविषयी योग्य माहिती नसल्याने अशाप्रकारचे दुर्लक्ष होत असते. जीभेसंबंधीत काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

जखम लवकर भरते
जीभेचा जास्तीत जास्त भाग स्केलटल मसल्स टिश्यूचा असतो. यामुळे जखम झाल्यास शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत ही जखम लवकर बरी होते.

नैसर्गिक क्लीनर
जीभ नैसर्गिक क्लीनरचे काम करते.  जेवणानंतर जीभ दातांना सहज स्वच्छ करते.

चव
सर्वच प्रकारच्या चव जीभेवर नसतात. त्यामधील जवळपास १० टक्के गालांवर आणि तोंडांत असतात.

उच्चारामध्ये उपयोगी
उच्चारांसाठी जीभेचा समोरचा लवकचीक भाग खुप आवश्यक असतो.

चवीची ओळख
जीभेच्या एका सेंस ऑर्गनने विविध चवींची ओळख करता येते. जीभ पाच विशिष्ट चवी ओळखते. ज्यामध्ये आंबट, कडू, खारट, गोड आणि तिखटचा समावेश आहे.

टेस्ट बड्स 
जीभेमधील टेस्ट बड्स खुप लहान असतात. तरीही डोळ्यांनी दिसू शकतात.

मजबूत मसल्स
जीभ हे शरीरातील सर्वात मजबूत मसल्स आहे. तसेच ती खूप लवकचीक असते. हा एकमेव असा अवयव आहे ज्यामध्ये टेस्ट सेंसर असतात आणि यामध्ये १० हजार पेक्षा जास्त  टेस्ट घेण्याची क्षमता आहे.

जीभेची लांबी
सर्वात लांब जीभ सुमारे ३.८६ इंच लांब आणि ३.१ इंच रुंद असू शकते. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या जीभेची उंची कमी असते. महिलांमध्ये सर्वात लांब जीभ जवळपास २.७६ इंच लांब असते.

बॅक्टेरिया
तोंडातील जवळपास ५० टक्के बॅक्टेरिया जीभेवर असतात. यामुळे श्वासांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी जीभ स्वच्छ करणे खुप महत्त्वाचे असते.