अहो आश्चर्यम ! ८४ वर्षाच्या आजी करतात ‘योगा’
मुंबई : आरोग्यनामा ऑनलाईन – एकदा आपण स्वतःला साधारण-सुलभ चाकोरीत बसवून घेतलं की योगाला पूरक अशी पार्श्चभूमी तयार होते. निरोगीआयुष्य जगायचे असेल तर व्यायाम-योग-आसन-प्राणायम याला विहित वेळ देणे गरजेचे आहे. सकाळ, सायंकाळ योगासाठी वेळ काढला तर अनेक आजार कमी होतात. योग हा दु:ख नष्ट करतो. त्यामुळे आपण अनेक वर्ष निरोगी आणि चांगले आयुष्य जगू शकतो.
अशाच मुंबईतील एक ८४ वर्षाच्या आजीबाई आहेत. त्या अजूनही योगा करतात. हि खरच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळे त्या आजही एकदम फिट आहेत. उषा जोशी असं या आजीबाईंच नाव आहे. अगदी तरुण मुलांनाही जी आसन जमणार नाहीत. ती आसन आजीबाई अगदी सहज करतात. कारण योगाच्या माध्यमातून त्यांनी आपलं शरीर अगदी लवचिक बनवलं आहे. त्यामुळे कोणतीही आसन त्या करू शकतात.
त्यामुळे वयाच्या ८४ व्या वर्षीही त्या सरळ चालू शकतात. त्यांना कोणताच आजार नाही. योगा हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण योगाचे अनेक फायदे आहेत. योगामुळे माणूस निरोगी तर राहतोच. परंतु त्याला दीर्घायुष्य हि लाभत. तुम्हालाही निरोगी आणि दीर्घायुष्य हवं असेल तर रोज नियमित योगा करणं गरजेचं आहे. तरच निरोगी आणि दीर्घायुषी होऊ शकता.