‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – माणसाने कितीही प्रगती केली असली तरी आजही मनुष्याच्या शरीराविषयी काही गोष्टी रहस्यमय आहेत. मनुष्याला होणाऱ्या काही आजारांच्या बाबतीतही असेच आहे. त्यामधीलच काही मेंटल डिसऑर्डर जे ऐकायला जेवढे विचित्र वाटतात तेवढीच त्यांची लक्षणे विचित्र आहेत. जगभरातील खूपच थोड्या व्यक्ती या डिसऑर्डरने ग्रस्त आहेत. हा Sexsomnia तर एकदम विचित्र आहे. या आजाराने ग्रासित लोकांना झोपेत सेक्स करण्याची सवय असे. काही लोक झोपेत चालतात किंवा बोलतात. तसेच Sexsomnia ने ग्रस्त लोक झोपेमध्ये सेक्स करतात. डोळे उघडल्यानंतर त्यांना आपण काय केले हे लक्षात राहत नाही.
मनुष्याचा मेंदू आजही एक रहस्य आहे. कॉम्प्युटर पेक्षा जलद चालणाऱ्या या अवयवामध्ये थोडा जरी बिघाड झाला तरी अशाप्रकारचे आजार निर्माण होतात. आणखी एक मेंदूशी संबंधीत असा आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती नशा न करताही सतत नशेमध्ये धुंद असतो. या आजारास Auto-brewery Syndrome म्हणतात. यामध्ये व्यक्तीचे शरीर पाचन तंत्रामध्ये एथेनॉलचे उत्पादन करते, ज्यामुळे तुम्ही नेहमी नशेत राहता. चक्कर येणे, मन एकाग्र न होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराने ग्रासित लोक अनेक वेळा डिप्रेशनला बळी पडतात. जर तुम्हाला कधी तुमच्या डोकेदुखीचे कारण लक्षात आले नाही तर वाय-फाय बंद करून पाहा. मेडिकल सायन्सनुसार Electromagnetic Sensitivity मध्ये मनुष्याला electromagnetic तरंगांचा त्रास होतो. ज्या ठिकाणी विद्युत संचार असेल तेथे electromagnetic तरंगांचा प्रभाव असतो. म्हणजेच लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल फोन तसेच लाईट बल्बसुद्धा डोकेदुखी निर्माण करू शकतो.
या आजारात व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे इमोशन किंवा भाव जाणवत नाहीत. भावना व्यक्त करू न शकणे आणि त्यांची जाणीव न होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती महत्त्वाच्या वेळेला फालतू जोक करत असेल तर त्याची ही सवय नेहमीचीच असल्यास तो Witzelsucht ने ग्रासित असू शकतो. हा एक दुर्लभ आजार आहे, ज्यामध्ये व्यक्ती फालतू जोक केल्याशिवाय राहू शकत नाही. डोक्याच्या फ्रंटल लोबमध्ये इजा झाल्यास ही स्थिती निर्माण होऊ शकते. ज्या लोकांना Exploding Head Syndrome असेल त्यांना मोठा आवाज, चुंबकीय तरंग, प्रखर प्रकाश यासारख्या गोष्टी डोक्यात जाणवतात. वैज्ञानिकांच्या मतानुसार या अवस्थेमध्ये रोगी अर्धा झोपेत आणि अर्धा वास्तवामध्ये असतो. यामुळे स्वप्नात पाहिलेल्या गोष्टीसुद्धा हे लोक सत्य समजतात.
एखादी व्यक्ती सकाळी झोपेतून उठल्यानंतर तिची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बदलू शकते.अनेकवेळा ट्युमर किंवा मेंदूला इजा झाल्यानंतर मनुष्याची वागणूक अशाप्रकारे बदलते. आपला आवाजच आपली ओळख आहे आणि तोच बदलला तर व्यक्तिमत्व हरवून जाण्याची भीती राहते. अशाप्रकारच्या सिंड्रोमने ग्रासित लोकासाठी सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे यांचा क्लोन असणे. या अवस्थेमध्ये ग्रासित लोकांना सतत वाटत राहते की, त्यांच्या जवळ असलेल्या लोकांना क्लोनने बदलण्यात आले आहे. ज्या लोकांना Paranoid Schizophrenia असेल त्यांच्यामध्ये असे लक्षण दिसून येतात.