सिट-अप्स आणि बेंड्स
जीममध्ये जाणे शक्य नसल्यास सिट-अप्स, वेस्ट बेंड्स, नी बेंड्स आणि काल्फ एक्सरसाइज करावी. यामुळे मांसपेशी मजबूत आणि फ्लेक्सिबल होतात.
बॉक्सिंग एक्सरसाइज
किक बॉक्सिंग हा एक फास्ट आणि भरपूर उर्जा देणारा व्यायाम आहे. यामुळे प्रत्येक तासाला शरीरातील भरपूर कॅलरी बर्न होतात.
डान्स थेरेपी
डांन्स एक चांगले वर्कआउट आहे. यामुळे शरीराला फ्लेक्सिब्लिटी मिळते. डान्स केल्याने मानसिक ताण कमी होतो. पार्टनरसोबतही डांन्स करता येईल. वजन कमी करण्याचा हा उत्तम पर्याय आहे.
बॉल एक्सरसाइज
घरात बॉलच्या मदतीने एक्सरसाइज करता येईल. बॅलेंस्ड एक्सरसाइज करता येते. आरामदायी बॉलवर व्यायाम केल्यास फायदा होतो.
योगा
पावसाळ्यात घरात करता येणारा व्यायाम प्रकार म्हणजे योगा होय. यामुळे श्वासासंबधी समस्या दूर होतात. पावसाळ्यात श्वासाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोज प्राणायाम केल्यास फायदा होतो. तसेच प्राणायमसोबत पाच वेळा सूर्यनमस्कार घालावेत.
दोरीवरच्या उड्या
पावसामुळे मॉर्निंग वॉकवर जाणे शक्य होत नाही. अशावेळी घरामध्ये दोरीवरच्या उड्या मारता येतील. यामुळे हात आणि पायाच्या मांसपेशी मजबूत होतात. हलकी स्ट्रेचिंग एक्सरसाइज करुन शरीर वॉर्मअप करावे.
एक पेअर डंबलने विविध व्यायाम करता येतात. जसे कर्ल, स्क्वॅट, रो आणि किकबॅक्स करता येते. डंबेल्स नसतील तर १ लीटर पाण्याची बाटली वापरता येते. नंतर २ लीटर पाण्याची बाटली घ्यावी.
पुश-अप्स
पुश-अप्स, सिट-अप्स, चिन अप्स, पुल अप्स आणि चेअर डिप्स एक्सरसाइज सुद्धा घरात करता येते. यामुळे खांदे, दड मजबूत होतात. फॅट कमी होते.