आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सणासुदीला गोड पदार्थांची रेलचेल असते. नुकताच होळीचा सण साजरा झाला आहे. अशा सणांत ऑयली आणि हाय कॅलरी फुडमुळे आपल्या तब्येतीवर खुप वाईट परिणाम होतो, वेगाने वजन सुद्धा वाढू शकते. यासाठी सणाच्या दुसर्या दिवशी बॉडी चांगल्याप्रकारे डिटॉक्सीफाय करणे आवश्यक असते. बॉडी डिटॉक्सीफिकेशनच्या 8 सोप्या पद्धती जाणून घेवूयात…
1. सकाळी-सकाळी गरम पाणी प्या –
दिवसाची सुरूवात लिंबू पाण्याने करा. एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा लिंबूरस टाका.
2. प्रोटीनची मात्रा वाढवा –
वजन कमी करण्यात प्रोटीन सर्वात जास्त परिणामकारक आहे. प्रोटीन मांसपेशी तयार करण्यासाठी उपयोगी आहे. आपल्या डाएटमध्ये अंडे, चिकन, बीन्स, डाळ, शेंगा ई.चा समावेश करा.
3. फायबर वाढवा –
फायबर एक नॅचरल डिटॉक्सिफाईंग एजंट आहे. आहारात फायबर वाढवण्यासाठी काकडी, गाजर, सलाड, स्प्राउट्स आणि हिरव्या पालेभाज्या खा.
4. खाण्याचे प्लॅनिंग करा –
असे प्लॅनिंग करा ज्यामध्ये थोडे-थोडे अनेकदा खा. यामुळे भूक कमी लागेल आणि ओव्हर इटिंग होणार नाही.
5. भरपूर पाणी प्या –
दिवसभरात 8-9 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातून सर्व टॉक्सिन बाहेर पडतील.
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या
6. मांस खाणे टाळा –
सणानंतर पचनक्रियेवर कमी दबाव टाका, हलके अन्न खा, मास टाळा.
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
7. जेवणात अनेक गोष्टींचा समावेश –
जेवणात कार्ब्स आणि फॅट्ससारख्या वस्तू घ्या. डाएटमध्ये ताजी फळे, भाज्या, डाळ, शेंगा, नट्स आणि सीड्सचा समावेश करा.
स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?
8. चांगली झोप घ्या –
कमी झोप घेतल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. सण संपला आहे, आपली झोप पूर्ण करा. झोपण्यापूर्वी एक कप दुधात थोडी हळद, दालचिनी, सुंठपावडर आणि गुळ टाकून प्या. यामुळे इम्यूनिटी वाढेल आणि चांगली झोप येईल.
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ