आरोग्यानामा ऑनलाइन टीम – कोरफडमध्ये व्हिटामीन बी १२ भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच मधुमेह, वेदना कमी होतात. हे कीटाणूनाशक सुद्धा आहे. तसेच कोरफड जेल आरोग्यासाठी खुप गुणकारी आहे. अनेक आजारांत याच्या रसाचे सेवन केले जाते. सौंदर्यवृद्धीसाठी कोरफडचा वापर केला जातो.
हे आहेत फायदे
१ कुठलाही अवयव लचकल्यास कोरफडीच्या ताज्या गरात थोडी हळद आणि सैंधव मीठ टाकून हलके गरम करून हे मिश्रण लचकलेल्या भागावर बांधावे.
२ जळालेल्या किंवा चटका बसलेल्या भागावर कोरफडीचा ताजा गर लावल्यास फोड येत नाहीत.
३ डोकेदुखी होत असल्यास कपाळावर कोरफड जेल लावा. लगेच आराम मिळतो.
४ पोटदुखी होत असल्यास कोरफडीच्या गरावर थोडेसे मीठ टाकून खाल्ल्यास आराम मिळतो.
५ सांधेदुखी आणि अंगदुखीत कोरफड रसाचे सेवन केल्यास आराम मिळतो. यामुळे शरीरात अँटीबॉडीज घटक आणि पांढर्या रक्तपेशी निर्मिती होण्यास मदत होते.
६ सूज कमी होण्यास मदत होते. मुक्का मार लागलेल्यावर देखील कोरफड उपयुक्त ठरते.
७ मूत्रपिंडाशी संबंधित संसर्गात कोरफड जेल गुणकारी ठरतो. कोरफडीच्या ताज्या जेलमध्ये पाणी आणि साखर मिक्स करून रस तयार करावा. हा रस प्यावा.
८ लघवी करताना होणारी जळजळ कमी होते.