आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरातील नसा आणि धमन्यांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल जमा होण्यास सुरुवात झाल्यास रक्तप्रवाह प्रभावित होतो आणि हृदयरोग वाढतो. रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल काही भाज्यांचे नियमित सेवनाने नियंत्रित होऊ शकते. शिवाय या भाज्या गुड कोलेस्टेरॉल तयार करण्यासही मदत करतात. अशा भाज्यांचे नियमित सेवन केल्यास हृदयरोगासारखे गंभीर आजार दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. या भाज्या कोणत्या आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
मशरूम
मशरूम एक चमत्कारिक भाजी आहे. या भाजीच्या नियमित सेवनाने बॅड कोलेस्टेरॉल कमी होते आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढते.
पत्ताकोबी
पत्ताकोबीमध्ये गंभीर आजार दूर करण्याची शक्ती आहे. पत्ताकोबीचा रस कॅन्सर, हृदयरोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस इत्यादी गंभीर आजारांवर रामबाण उपाय आहे.
लसून
सकाळी झोपेतून उठल्यानंतर ३-४ लसणाच्या पाकळ्या चावून-चावून खा. लसूण कोलेस्टेरॉल रुग्णांसाठी एखाद्या रामबाण औषधीपेक्षा कमी नाही. कच्चा लसूण खाणे शक्य नसल्यास लसणाची चटणी तयार खा.
अद्रक
अद्रक कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करण्यात खूप उपयोगी ठरते. केवळ ३ ग्रॅम अद्रकाचे नियमित सेवन रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्टेरॉल तयार करते.
पुदिना
पुदिन्याचे सेवन बॅड कोलेस्टेरॉलला कमी करण्यात खूप सहायक ठरते. दररोज ५ ते १० मिली पुदिन्याचा रस कोलेस्टेरॉलसाठी रामबाण आहे.
कांदा
आहारात अर्धा कांदा नियमित घेतल्यास शरीरात वाढलेल्या बॅड कोलेस्टेरॉलला कमी करून चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करेल.
भोपळा
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास भोपळ्याचा रस घ्यावा, यामध्ये पुदिना आणि तुळशीची चार-पाच पाने टाकावीत. हे मिश्रण केवळ तुमचे बॅड कोलेस्टेरॉल कमी करते. तसेच हृदयाच्या धमन्यात जमा झालेला क्लॉटही साफ करते.