आरोग्यानामा ऑनलाईन टीम – थायरॉइड हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. या आजाराचे निदान लवकर होत नसल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. या आजारामुळे शारीरीक उर्जा खर्च करण्याची क्षमता आणि अनेक अन्य कार्यांवर परिणाम होतो. योग्य वेळी याचे संकेत ओळखले पुढील त्रास टाळणे शक्य होते. यासाठी थायरॉइडचे काही संकेत आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत संकेत
१ अचानक भूक वाढणे हा हायपरथायरॉयडिज्म आणि भूक कमी होणे हा हायपोथायरॉयडिज्मचा संकेत असू शकतो.
२ विनाकारण हात, पाय, कंबर, खांदे किंवा सांध्यांमध्ये वेदना होणे हा थायरॉइडचा संकेत असू शकतो.
३ रात्री झोप येणे, डिप्रेशन किंवा विसरण्याची सवय असल्यामुळे बॉडीमध्ये थायरॉक्सिन हार्मोन्स लेव्हल कमी होण्याचा संकेत असू शकतो.
४ थोडेसे काम केल्यावर थकवा आणि आळस येणे हा हायपोथायरॉयडिज्मचा संकेत असू शकतो. अशा वेळी लवकरात लवकर थायरॉइड टेस्ट करावी.
५ यामुळे मेटाबॉलिक रेट कमी होतो. थोडीशी गरमी झाल्यावर खुप जास्त घाम येणे, थोडीशी थंडी असल्यावर खुप जास्त थंडी वाजणे, अशा समस्या होतात.