आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सौंदर्यवृद्धीसाठी कोरफड रसाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. कोरफडीमध्ये विविध औषधी गुण असल्याने त्याचा वापर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. अनेक रोगांवर हा उपाय रामबाण ठरतो. कोरफडीत औषधी गुण असल्याने अनेकजण आपल्या घरासमोरही लागवड करतात. परंतू शुद्ध स्वरूपातील कोरफडीचा गर प्रमाणापेक्षा जास्त पोटात गेल्यास त्रासदायक ठरू शकतो. यासाठी थोडी दक्षता घेणे गरजेचे असते. कोरफडीचे चूकीच्या पद्धतीने सेवन केल्यास कोणते दुष्परिणाम होऊ शकतात, याविषयी माहिती घेवूयात.
गर्भपात
गरोदर महिलांनी कोरफड घेणे टाळावे. कोरफडीमुळे गर्भपातासोबतच मुलांमध्ये दोष निर्माण होण्याची शक्यतादेखील आहे. त्यामुळे १२ वर्षाखालील मुलांनादेखील कोरफडीचा रस देणे त्रासदायक आहे. बाळाला दुध पाजत असाल तर कोरफड घेऊ नका.
अॅलर्जी
कोरफडीचा रस घेतल्याने सूज येणे, खाज येणे, घश्यात किंवा छातीत वेदना होणे अशा समस्या आढळतात.
औषधांचा परिणाम
औषधांसोबतच अधिक प्रमाणात कोरफडीचा गर घेतल्यास त्यातील काही घटक औषधांचा परिणाम कमी होतो. त्यामुळे अशा स्वरूपात कोरफडीचा गर घेणे हे शरीराला घातक ठरू शकते.
पाण्याची कमतरता
कोरफड अधिक प्रमाणात खाल्ल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.
रक्तातील साखर
कोरफडीमुळे रक्तातील रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी होते. तसेच हाइपोग्लाइसेमियाचा त्रास असल्यास कोरफडीचा गर घेण्यापूर्वी अवश्य विचार करावा.
डायरिया
कोरफडीमध्ये रेचक घटक असल्याने अतिप्रमाणात त्याचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पचनाचा त्रास किंवा गॅसची समस्या असल्यास प्रमाणापेक्षा अधिक कोरफडीचा गर खाऊ नये.
पोटॅशियम
अधिक प्रमाणात कोरफडीचा गर खाल्ल्यास शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते. यामुळे हृद्याचे ठोके अनियमित पडतात तसेच दुबळेपणा जाणवतो.