आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीर स्वच्छ ठेवले तरच आरोग्य चांगले राहते. शरीराच्या काही भागांना उघड्या हातांनी स्पर्श करु नये, असे तज्ज्ञ सांगातात. कारण हातामुळे मोठ्याप्रमाणात जर्म पसरतात. हातांची स्वच्छता न राखल्यास नुकसान होऊ शकते. नखे नियमित कापली नाही तर हातांवर मायक्रोब्स जमा होतात. यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या अवयवांना उघड्या हातांनी स्पर्श करू नये, याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
नितंब
एनस (मलद्वार) मध्ये अनेक बॅक्टेरिया असतात जे खुप हानिकारक असतात. मलत्याग केल्यानंतर किंवा इतर कारणामुळे शरीराच्या या भागाला स्पर्श केल्यास चांगल्या सेनिटायजर सोपने हात धुवावेत.
नाक
नाकात बोट घालण्याची वाईट सवय बंद करावी. यामुळे स्टेफिलोकोकस बॅक्टेरिया संक्रमित होण्याची भीती ५१ टक्के अधिक असते.
डोळे
कांटॅक्ट्स लेंस लावल्यानंतर किंवा डोळ्यात काही औषधी टाकल्यानंतर डोळ्यांना हात लावू नयेत. जर्म डोळ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. यामुळे डोळ्यांना कधी हात लावू नये आणि चोळूही नये.
मुख
कामामुळे कंटाळा आल्यानंतर अनेकजण एक तासात २३.६ वेळा तोंडाट बोट घालतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर कामात व्यस्त असताना ६.३ वेळा तोंडात बोट घातले जाते. शरीरात एक तृतियांश जर्म तोंडात बोट घातल्यानेच पोहोचतात.
नखांच्या खालील त्वचा
बॅक्टेरिया पसरण्यापासून वाचण्यासाठी नखे नियमित कापली पाहिजेत. नखे स्वच्छ करण्यासाठी मुलायम ब्रशचा वापर करा. नख मोठे असल्यामुळे किंवा स्वच्छ नसल्यामुळे त्याखालील त्वचेला ओनिकोलाइसिसचा धोका असतो.
कान
कानात कोणतीही वस्तू घालू नये. यामुळे कानाचा पडदा फाटू शकतो. कानात खाज येत असेल तर अथवा समस्या खुपच बिकट असेल तर डॉक्टरांकडे जावे.
चेहरा
तुम्ही फक्त चेहरा धुण्यासाठी हातांचा वापर करावा. याव्यतिरिक्त तेथे हात लावू नका. बॅक्टेरीयाच्या ठिकाणी ठेवलेला हात चेहरा किंवा कपाळावर ठेवल्यास आजार होण्याची शक्यता असते.