आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मधाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. मध हे निरोगी जीवनासाठी सुयोग्य मानले जाते. अनेक प्रकारच्या शारीरिक विकारांसाठी मध उपयोगी मानले जाते. विशेष म्हणजे ताकातसुध्दा अनेक गुण असतात. उन्हाळ्यात ताक पिणे खुप चांगले असते. ताकात मध मिसळून पिण्याचे अनेक फायदे असून त्याविषयी माहिती घेवूयात.
हे आहेत फायदे
* अदिवासी लोक मुलांना सकाळी सकाळी चपातीसोबत मध देतात. मध हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. मध ताकात मिसळून पिल्यानेसुध्दा स्मरणशक्ती तल्लख होते.
* मध शुध्द असेल तर नियमित एक एक थेंब डोळ्यात टाकल्याने डोळ्यांची स्वच्छता होते. नेत्रज्योतीसाठी मध एक उपयुक्त उपाय आहे.
* मुलांना जेव्हा नवीन दात येतात तेव्हा हिरड्यांवर सूज येते. यामुळे त्यांना खुप त्रास होत असते. अशा वेळी हिरड्यांवर मध लावल्याने आराम मिळतो.
* शौचाला जाण्याअगोदर मध पाण्यात मिसळून ३-४ महिने पिल्याने वजन कमी होते. दोन चमचे मध आणि अध्र्या लिंबूचा रस कोमट पाण्यात मिसळून नियमित सकाळी पिल्याने वजन कमी करण्यात मदत मिळते.
* मध हे दूधासोबत मिसळून पिले तर हृदय, मेंदू आणि पोटासाठी फायदेशीर असते. उन्हाळ्यात लिंबूपाणीत मध मिसळून पिल्याने शरीरात ऊर्जा आणि गारवा मिळतो.
* जखम झाल्यावर किंवा जळालेल्या ठिकाणी मध लावावे. मधाच्या अँटीबॅक्टेरियल गुणांना आधुनिक विज्ञानसुध्दा मानते.
* डोके दुखत असल्यास डोक्यावर चुना आणि मध लावतात. मध मेंदूला शांत ठेवते आणि डोकेदुखी कमी करते.