आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नाभी हा आपल्या शरीराचा मध्यभाग आहे. या अतिशय कोमल आणि नाजून भागाची स्वच्छता राखणे खूप महत्वाचे असते. मात्र, चेहरा आणि शरीराच्या अन्य भागाची काळजी घेणारे असंख्य लोक नाभाची स्वच्छता करत नाहीत. यामुळे नाभीला विविध प्रकारचे इन्फेक्शन होते. हे इन्फेक्शन कोणत्याही वयात होऊ शकते. नवजात शिशूलासुद्धा हा धोका असतो. हे इन्फेक्शन बॅक्टेरिअल आणि यीस्ट इन्फेक्शन, अशा दोन प्रकारचे असते. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही खास उपाय जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
* नाभीचा भाग खूप खोल असल्याने इन्फेक्शनचा धोका असतो.
* घाम, साबण, पियर्सिंगसुद्धा बॅक्टेरिअल इन्फेक्शन वाढवू शकतात.
* स्वच्छ न राहण्याची सवय
* सर्जरी, डायबिटीजसह इतरही कारण असू शकतात.
* नाभी लाल होणे, वेदना, सूज यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
हे खास उपाय करा
* १ चमचा मीठ एक कप गरम पाण्यामध्ये टाका. कापूस किंवा सुती कपड्याने हे पाणी नाभीवर चांगल्याप्रकारे लावा. थोड्यावेळाने नाभीवर अँटीबॅक्टेरिअल क्रीम लावा. दिवसातून तिन-चार वेळेस हा उपाय केल्यास लाभ होईल.
* कडूनिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून घ्या. यामध्ये हळदसुद्धा टाकू शकता. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने नाभी स्वच्छ करून घ्या. दिवसातून २ वेळेस हा उपाय करावा.
* सुती कपडा गरम पाण्यात भिजवून घेतल्यानंतर चांगल्याप्रकारे पिळून घ्या. त्यानंतर हा कपडा थोडावेळ नाभीवर ठेवा. या उपायाने लवकर आराम मिळेल.
* कापसाच्या मदतीने नाभीच्या जवळपास अल्कोहल लावावे. त्यानंतर कापसानेच मालिश करावी. दिवसातून ३-४ वेळेस हा उपाय करू शकता.
* १ चमचा व्हिनेगर आणि २ चमचे पाणी एकत्र करून घ्या. कापसाच्या मदतीने हे मिश्रण नाभीच्या जवळपास चांगल्याप्रकारे लावून ठेवा. १० -१५ मिनिटानंतर गरम पाण्याने नाभी स्वच्छ धुवून घ्या. दिवसातून २-३ वेळेस हा उपाय केल्यास इन्फेक्शन दूर होईल.
* कोरफडीचा गर काढून घ्या. त्यानंतर हा गर नाभीवर थोडावेळ लावून ठेवा. थोड्यावेळाने टिश्यू पेपरने नाभी स्वच्छ पुसून घ्या.
* हळद पाण्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करून घ्या. नाभीच्या जवळपास ही पेस्ट लावून वाळू द्या. पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने नाभी धुवून घ्या. दिवसातून २-३ वेळेस हा उपाय केल्यास इन्फेक्शनची समस्या दूर होते.