आरोग्यानामा ऑनलाइन – अल्झायमर या आजारावर अजूनही ठोस उपचार नाहीत. याचे निदान लवकर झाले तर काही उपचाराने यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. स्मरणशक्तीशी संबंधीत हा आजार होण्यामागे विविध कारणे आहेत. रक्तदाब, मधुमेह, आधुनिक जीवनशैली आणि डोक्यावर जखम झाल्याने तो होऊ शकतो. या आजाराचे संकेत आपण जाणून घेणार आहेत.
हे आहेत संकेत
1 स्मरणशक्ती
या आजाराने पूर्ण स्मरणशक्ती पुसली जाऊ शकते. नाव विसरणे, वस्तू हरवणे, ठरवलेल्या गोष्टी विसरणे, शब्द लक्षात न ठेवू शकणे, गोष्टी शिकण्यात आणि त्या लक्षात ठेवण्यात अडचणी निर्माण होतात. कुणालाही ओळखता येत नाही.
2 निर्णय क्षमात
निर्णय क्षमता कमी होते. पर्याय निवडता येत नाहीत.
3 शारीरिक नियंत्रण
शरीरावर नियंत्रण राहत नाही. यामुळे रोजची अनेक कामे करताना अडचण निर्माण होते.
4 अंक, अक्षर विस्मरण
अक्षरांची किंवा अंकांची ओळख करण्यास त्रास होऊ शकतो. हिशोब करण्यासही समस्या येतात.
5 वेळ, तारीख, ठिकाण विसरणे
वेळ, तारीख आणि दिवस तसेच ओळखीची ठिकाणेही लक्षात राहत नाहीत. व्यक्ती घराचा पत्ताही विसरु शकता. तसेच काय काम करतो हेही विसरु शकता.
6 बोलण्यात अडचण
भाषा नीट बोलता येत नाही. जे वाटते ते शब्दात व्यक्त न करता येणे.
7 व्यक्तीमत्वात बदल
विनाकारण आक्रामक होणे. चिंतेत राहणे.