आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डायबिटीज हा सायलेंट किलर आजार आहे. याच्यावर नियमित व वेळेवर उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. यासाठी वेळीच खबरदारी घेतल्यास याच्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असते. आपण दिवसभरात अशा काही चुका करतो ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल आणि इंसुलिन लेव्हल बिघडते. यामुळे डायबिटीजची शक्यता वाढते. अशाच ७ चुकांविषयी आपण माहिती घेणार आहोत.
जास्त वेळ बसणे
बैठे काम करणारांचे इन्सुलिन लेव्हल वाढते. यामुळे डायबिटीजची शक्यता वाढते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना ही समस्या जास्त होते. यापासून बचाव करण्यासाठी रोज एक दोन तास पायी चालावे किंवा सकाळी ३० मिनिटे व्यायाम करावा.
मानसिक ताण
दिवसभर जास्त मानसिक ताण घेतल्याने शरीरात ग्लुकोजन आणि कॉर्टिसोल हार्मोन्सची लेव्हल वाढते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि डायबिटीज होण्याची शक्यता वाढते.
उशीरा जेवण
रात्री उशीरा जेवण केल्याने आणि लगेच झोपल्याने वजन वाढते. यामुळे ब्लड शुगर बॅलेन्स बिघडते. आणि डायबिटीजची शक्यता वाढते.
पाणी
दिवसभरात कमीत कमी १० ग्लास पाणी न प्यायल्यास बॉडी हायडड्ढेट राहू शकत नाही. यामुळे ब्लड शुगर लेव्हल बॅलेन्स बिघडते. अशावेळी डायबिटीजची शक्यता वाढू शकते.
झोप न घेणे
रोज ७ ते ८ तासांची झोप न घेतल्यास मेटाबॉलिजम कमी होते. यामुळे बॉडीमध्ये एक्स्टड्ढा फॅट जमा होते यामुळे डायबिटीजची शक्यता वाढते.
आहार
अयोग्य आहार घेतल्यास ब्लड शुगर लेव्हल बिघडू शकते. यामुळे डायबिटीज वाढते.
स्नॅक्स खाणे
दिवसभरात हाय कॅलरीचे स्नॅक्स खाल्ल्याने बॉडीमध्ये भरपूर कॅलरी वाढतात. यामुळे फॅट वाढते. यामुळे डायबिटीजची शक्यता वाढते.