आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रात कांदेपोहे हा पदार्थ नाष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. घरोघरी हा पदार्थ तयार केला जातो आणि आवडीने खाल्ला जातो. तसेच पोह्यापासून इतरही अनेक पदार्थ तयार केले जातात. यामध्ये अकरा प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. शिवाय, पोहे सहज पचन होतात. अनेक आजारात ते फायदेशीर आहेत. पोहे खाण्याचे ७ फायदे कोणते हे आपण जाणून घेणार आहोत.
१. हृदयासाठी लाभदायक
पोहे लेस्टोस आणि फॅट फ्री आहेत. यामुळे हे हृदयासाठी लाभदायक आहेत.
२. ग्लुटेन फ्री
हे ग्लुटेन फ्री आहे. यामुळे ज्यांना पीठाची अॅलर्जी आहे ते सुद्धा खाऊ शकतात.
३. साखर नियंत्रित राहते
यात व्हिटॅमिन बी आणि आयर्न भरपूर असल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते.
४. वजन कमी होते
यातील प्रोटीन्स आणि काब्र्स भूक कमी करतात. यामुळे वजन कमी होते.
५. तापात खावेत
पोट खराब झाल्यावर अथवा ताप आल्यावर पोहे खाणे चांगले आहे.
६. उर्जा मिळते
फॅट्स, कार्बमुळे उर्जा टिकून राहते.
७. डायजेशन
पोहे सहज पचतात. डायजेशन चांगले राहते.