आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मायग्रेनच्या समस्येत अर्ध डोकं दुखणे किंवा पूर्ण डोकं दुखण्याचा त्रास होतो. शिवाय मानेच्या खालच्या भागातही वेदना होतात. या वेदनादायी त्रासातून सुटका मिळण्यासाठी अनेक उपाय आहेत. मात्र, ही समस्या कशामुळे होते हे जाणून घेतल्यास ती टाळता येणे सहज शक्य आहे. कोणत्या चुकीच्या सवयींमुळे मायग्रेनची समस्या होते ते जाणून घेवूयात.
या सवयी आहेत कारणीभूत
१ वेळेवर जेवण न करणे, जास्त प्रमाणात मद्यसेवन, वातावरणातील बदल, आहारातील बदल आणि कमी झोप घेणे.
२ आवश्यक तेवढे पाणी न प्यायल्याने ही समस्या निर्माण होते.
३ व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये मायग्रेनची समस्या होऊ शकते.
४ चहाच्या अधिक सेवनामुळेही डोकेदुखीचा त्रास होतो.
५ मायग्रेनची समस्या होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तणाव आहे.
६ फार घट्ट कपडे परिधान केल्याने पोटावर दाब येतो, ज्यामुळे डोकेदुखी होते.
Visit : arogyanama.com