‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कानदुखीचा त्रास खूपच असह्य असतो. विशेष करून लहान मुलांना हा त्रास अधून-मधून होत असतो. कान दुखायला लागल्यास कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. सतत अस्वस्थ वाटते. अनेकदा वेदना जास्त होऊ लागल्यास जेवण करणे, उठणे-बसणे हे सर्व असह्य होते. इंन्फेक्शनमुळे कानदुखी होऊ शकते. अँटीबायोटिक औषध घेतल्यास अशी कानदुखी बंद होऊ शकते. थंडी, कानात मळ, कानातून निघणारे पाणी यामुळे काहीवेळा वेदना होतात. समस्या जास्त गंभीर नसल्यास घरगुती उपाय करणे योग्य ठरते.

हे उपाय करा

* लसणामध्ये अँटी-इन्फेमेटरी गुण असल्यामुळे हे कानाच्या वेदना दूर करण्यासाठी वापरण्यात येते. यासाठी लसणाची एक पाकळी बारीक करा आणि कापसात गुंडाळून घ्या. हे कानात ठेवा. जास्त आतमध्ये घालू नका.

* कांद्याचे लहान-लहान तुकडे करुन मंद आचेवर शेकून घ्या. यामुळे याचा वास दूर होईल. हे थोडेसे गरम असल्यावर लहान लहान तुकडे कानावर ठेवा. यानंतर एक कपडा घेऊन कानांना बांधून घ्या म्हणजे कांदे बाहेर निघणार नाही. वेदना काही वेळेतच दूर होतील.

* जेव्हा कॉनजेस्टनमुळे यूस्टेचियन टयूबमध्ये अडचण येते, तेव्हा एका पध्दतीने श्वास बंद आराम मिळू शकतो. यासाठी दिर्घ श्वास घ्या, तोंड, नाक एकदम बंद करा आणि कानाने श्वास सोडण्याचा प्रयत्न करा.

* कानात वेदना होत असतील तर बर्फ किंवा गरम पाण्याने कान शेकला जाऊ शकतो. यासाठी एक कॉटनचा कपडा गरम पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि कानाच्या आजुबाजूच्या भागात लावा. तुम्ही गार पाण्याचा वापर करु शकता. फक्त पाणी कानात जाणार नाही याची काळजी घ्यावी.

* काना जवळच्या भागावर तेलाने मसाज केल्याने ब्लड सर्कुलेशन वाढण्यात मदत होते. यासाठी तुम्ही लेवेंडर, नीलगिरी या तेलांचा वापर करु शकता. तेलाचे काही थेंब मान, जबडा आणि गालाच्या खाली लावून मालिश केल्याने फायदा होतो.

* अनेक लोकांना कानाच्या यूस्टेचियन ट्यूबमध्ये वेदना होतात. ही ट्यूब नाकाला जोडलेली असते. यामुळे एखाद्या आयुर्वेदिक आणि सुगंधीत तेलाचे थेंब गरम पाण्यात टाकून वाफ घ्यावी. आराम मिळतो. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये नीलगिरी किंवा लेवेंडर तेलाचे ३-४ थेंब मिसळून वाफ घ्या.