आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुकामेवा खुपच लाभदायक आहे. यापैकी बदाम तर लहान मुले आणि गरोदर महिलांसाठी खुप उपयोगी आहेत. गरोदर महिलांनी भिजवलेले बदाम सेवन केल्यास गर्भाची वाढ योग्यरित्या होते. तसेच गर्भाच्या मेंदुची आणि मज्जासंस्थेची वाढ चांगली होते. भिजवलेले बदाम पचायलाही हलके असतात.
हे आहेत फायदे
१ पचन
भिजवलेल्या बदामांच्या सालींमधील एन्जाईम्स मानवी शरीरातील पचनाला मदत करतात. शरीरातील मेद कमी होते.
२ उच्चरक्तदाब
उच्चरक्तदाब असल्यास भिजवलेले बदाम सेवन करावेत. यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते.
३ हृदयविकार
बदामातील अँटीऑक्सिडंट्समुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होतात. गुड कोलेस्टेरॉल वाढतात. यामुळे ह्रदयावरील ताण कमी होतो. ह्रदयविकार दूर राहतात.
५ बदामात कॅलरीज कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. भुकेवर नियंत्रण राहते.
६ वजन कमी होते.
Visit : arogyanama.com