आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सौंदर्यवृद्धीसाठी बेसनपीठ खुप उपयुक्त आहे. बेसन पीठाचे फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर करणे सहज शक्य होऊ शकते. त्वचा चमकदार करण्यासाठी बेसणाचे विविध प्रकारचे पॅक तयार करता येतात. हे पॅक कसे तयार करायचे, याची माहिती आपण घेणार आहोत.
असा बनावा पॅक
१ बेसनमध्ये गुलाब पाणी मिसळून लावावे. तेलकट त्वचेला या पॅकचा फायदा होतो.
२ एक चमचा बेसनमध्ये अर्धा चमचा हळद मिसळा. हे मिश्रण लावण्याने मुरुमांमुळे चेहऱ्यावर होणारी जळजळ कमी होते. मुरुमे कमी होतात.
३ बेसनमध्ये पपईचा गर आणि काही थेंब संत्र्याचा रस मिसळून हा पॅक चेहऱ्यावर लावा. रंग उजळतो.
४ चमकदार त्वचेसाठी दोन चमचे बेसन, लिंबू रसाचे काही थेंब आणि दुधाची साय एकत्र करुन याचा पॅक चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनी धुऊन घ्यावा.
५ कोरड्या त्वचेसाठी एक चमचा बेसनमध्ये मध आणि केळेमिसळून पॅक तयार करा. १० ते १५ मिनिटांनी धुऊन टाका.
Visit : arogyanama.com