आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पतीने पत्नीचे ऐकले तर याचा आरोग्याच्यादृष्टीने पतीला फायदा होतो, असे संशोधनात आढळून आले आहे. कॅनेडियन इंस्टीट्यूट ऑफ हेल्थने हे संशोधन केले आहे. या संशोधनानुसार, पत्नीचे ऐकले तर पती-पत्नीची रिलेशनशिप सुद्धा अधिक घट्ट होते. पत्नीचे ऐकले नाही तर याचे जास्त वाईट परिणाम पतीच्या आरोग्यावर होत असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. पत्नीचे ऐकल्यावर पुरुषांना कोणकोणते फायदे होतात, याविषयी जाणून घेवूयात.
तणाव कमी होतो
पत्नीचे ऐकल्यानंतर तर्क-वितर्क कमी होतील. यामुळे तणावाची पातळी कमी होते.
हॅपी हार्मोन्स रिलिज होतात
पत्नीचे ऐकल्याने वातावरण प्रसन्न होते. यामुळे हॅपी हार्मोन्स रिलिज होतात आणि मूड चांगला होतो.
निरोगी जीवनशैली
पती-पत्नीमध्ये ताळमेळ जुळल्यास जीवनशैली चांगली राहते. यामुळे जीवनशैलीसंबंधी आजार होत नाहीत.
इंटरेस्टिंग पर्सनल लाइफ
संशोधनानुसार जो पती आपल्या पत्नीचे ऐकण्यात रस दाखवतो, त्याची पर्सनल लाइफ इंटरेस्टिंग होते. याचा संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
आयुष्य वाढेल
एका संशोधनानुसार पतीने पत्नीचे ऐकल्यानंतर दोघांचे आयुष्य वाढते.