‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आपण नेहमी आपल्या त्वचेसंबंधी सतर्कता बाळगत असतो. त्यासाठी आपण सलून आणि बरीच ब्युटी व स्किन केयर प्रॉडक्ट्सचा वापर करत असतो. जरी ही उत्पादने आपल्याला सुंदर दिसण्यात मदत करत असली तरीही, त्वचेसाठी ही प्रॉडक्ट्स सुरक्षित नाहीत कारण ही उत्पादने सिंथेटिक रसायनांनी बनलेली असतात. ज्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते.
काही निरीक्षणांतून असे लक्षात आले की, ही उत्पादने कार्सिनोजेनिक असतात आणि तुमच्या त्वचेला नुकसान पोहचवतात. अशाच प्रकारची त्वचेला हानिकारक असलेली काही उत्पादने आपण जाणून घेऊया.
१) लिपस्टिक:
दररोज लिपस्टिकच्या वापरामुळे ओठांचा कोरडेपणा वाढतो आणि ओलावा कमी होतो. त्यासाठी लिपबामचा वापर करावा. जेणेकरून ओठांचा मुलायमपणा आणि ओलावा टिकून राहील तसेच काही लिप्स्टिकस व लीप-ग्लॉस ऑईल केमिकलयुक्त असल्याने ओठांना हानी पोहचवतात.त्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या उद्भवतात. लिप्स्टीकमध्ये असणारं मिनरल ऑइल एकप्रकारे नॉन-स्किन प्रमाणे काम करत. ज्यामुळे स्किन पोर्स बंद होतात आणि स्किन सेल्सचा विकास व फंक्शनिंग चांगल्या प्रकारे होत नाही.
२) काजळ:
काजळ हे डोळ्यांची सुंदरता वाढवण्यासाठी वापरले जाते. काजळ हि दैनंदिन जीवनातील फॅशन किंवा दुर्लक्षित न करता येणारं ब्युटी प्रॉडक्ट आहे. परंतु, काजळ मध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे केमिकल्स, विषाक्त पदार्थ, युवाईटिस, ग्लुकोमा, डोळ्यांचा कोरडेपणा आणि इन्फेक्शन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरमा किंवा काजळ यांचा अतिवापर टाळला पाहिजे.
३) नेल पॉलिश/नेलपेन्ट:
प्रत्येक मुलीच्या दैंनदिन वापरातील न टाळता येणारं ब्युटी प्रॉडक्ट म्हणजे नेलपेंट. रोज वेगवेगळ्या कपड्यांवर वेगवेगळ्या रंगाची नेलपेंट लावायची आपल्याला सवय असते पण ही सवय आपल्या नखांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. डार्क रंगाच्या नेलपेंट्स मुळे नखांवर पिवळे डाग पडतात व नखांमधील मॉइस्चर कमी होऊन ते तुटण्याची शक्यता खूप जास्त असते कारण तुमच्या नेलपेंटमध्ये एसिटोन हे रसायन असतं. म्हणून शक्य होईल तेवढा नेलपेंटचा अतिवापर टाळावा.
४) पाउडर:
टाल्कम पाऊडर सुद्धा आपल्या दररोजच्या वापरातील सौंदर्य वाढवणार प्रसाधन आहे. पण आपल्याला माहीत आहे काय? यात असलेल्या सिलिकेट रसायनाबद्दल जे तुमच्या त्वचेवर घातक केमिकल चा मारा करत व फुफ्फुसांत एलर्जी च संक्रमणही करत. टाल्क मध्ये अभ्रकाचे कण असल्याने प्रजनन प्रणालीत प्रवेश करण्यात सहज शक्य असतं परिणामी ओव्हेरियन कॅन्सर होण्याची शक्यता असते.
५) हेयर कलर/हेयर डाय :
आजकाल केसांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवण्याची फॅशन किंवा ट्रेंड खूप जोरात आहे. पण आपल्या या फॅशनचा परिणाम आपल्या केसांसाठी किती घातक असू शकतो याचा आपण विचार केलाय का? काहींना कल्पना असेलही, परंतु हेअरडायचा सतत वापर केल्याने आपले केस गळतात तसेच कोंड्याची समस्या, केसांना फाटे फुटने किंवा कायमचे टक्कल पडण्याचीही समस्यां उदभवू शकते कारण हेअर कलर किंवा डाय मध्ये पी-फेनीलीडेमाईंन नावाचं अतिघातक केमिकल असत म्हणून अश्या घातक डायचा वापर शक्यतो टाळावा.