आरोग्यानामा ऑनलाईन टीम : दातांच्या शेवटी असलेल्या दातांना अक्कल दाढ असे म्हणतात. सर्व दात आल्यानंतर अक्कल दाढा येतात. काही वेळा अक्कल दाढ १७ ते २५ वयादरम्यान तर काहींची २५ वयानंतरही येते. ही दाढ येताना खुप वेदना होतात. कारण ही दाढ वर येताना इतर दातांना ढकलत वर येते. त्यामुळे हिरड्यांमध्ये वेदना, सूज अशा समस्या होतात. या वेदना दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ लवंग
अक्कल दाढेजवळ लवंग ठेवल्यास वेदना कमी होतील.
२ कांदा
दातांखाली कांद्याचा तुकडा ठेवून चावा. आराम मिळेल.
३ गुळणी
कोमट पाण्यात मिठ टाकून गुळणी करा.
४ बर्फ
बर्फाचे छोटे छोटे तुकडे करुन दातांजवळ ठेवा. याने वेदना आणि हिरड्यांची सूज कमी होईल.
५ हिंग
चिमुटभर हिंग मोसंबीच्या रसात मिश्रित करुन कापसाच्या मदतीने अक्कल दाढेजवळ ठेवा.
Visit : arogyanama.com