आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेक महिलांना मासिक पाळीच्या त्या दिवसांमध्ये खुप त्रास होतो. हा त्रास होण्यामागे विविध कारणे असतात. यामुळे मासिक पाळीचा कालवधी अशा महिलांना नकोसा वाटतो. परंतु, काही खास उपाय केल्यास हा त्रास कमी करता येणे सहज शक्य आहे. यासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१. योनी स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर टाळा. स्वच्छतेसाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
२. पॅड बदल्यानंतर नेहमी गरम पाणी व साबणाने हात स्वच्छ करा.
३. दिवसात किमान दोन वेळा आंघोळ करा.
४. प्रत्येक सहा तासांनंतर सॅनेटरी पॅड बदला.
५. त्वचा संवेदनशील असल्यास कॉटन पॅड वापरा.