आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तोंड उघडे ठेवून झोपल्यास तोंडाने श्वास घेतला जातो. अशी सवय अनेकांना असते. तसेच काहीजण जागेपणीही तोंडानी श्वास घेतात. ही सवय आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. तोंडाने श्वास घेतल्याने अशुद्ध हवा शरीरात जाते. ओव्हर ब्रीदिंग, रक्तात ऑक्सीजन आणि कार्बन डायऑक्साइडची पातळी बिघडणे, अशा समस्या होऊ शकतात. तसेच अन्य आरोग्य समस्या सुद्धा निर्माण होतात.
होऊ शकतात या समस्या
१ दिर्घकाळ तोंडाने श्वास घेतल्याने टीबी, थायरॉइडची शक्यता वाढते.
२ तोंडाने श्वास घेतल्यामुळे हवा फिल्टर न होतातच लंग्स आणि पोटापर्यंत पोहोचते. यामुळे पोटात गॅस तयार होतात. यामुळे भविष्यात पोटासंबंधीत आजार होतात.
३ रोज तोंडाने श्वास घेण्याच्या सवयीमुळे दातांमध्ये सेंसिटिव्हिटी वाढते. यामुळे दातांची समस्या होऊ शकते.
४ तोंडाने श्वास घेतल्याने तोंडाची लाळ सुकून जाते. या लाळेमध्ये अनेक बॅक्टेरिया नष्ट करण्याची शक्ती असते. लाळ सुकल्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होते.
५ तोंडाने श्वास घेतल्यामुळे हवा थेट गळ्यापर्यंत जाते. यामुळे टॉन्सिलाइटिस, सायनोसायटिस किंवा रायनाइटिसची समस्या निर्माण होते.