आरोग्यानामा ऑनलाइन टीम – पद्मासन करताना शरीराला कमळाचा आकार दिला जातो. हे आसन म्हणजे केवळ ध्यानास्थ बसण्याची पध्दत असले तरी याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. पद्मासनाचे ५ फायदे आणि हे करण्याची पध्दत आपण जाणून घेणार आहोत. मात्र, गुडघेदुखी, पायांची सुज, पाठदुखी, ऑस्टियो आर्थरायटिस असणारांनी हे आसन करू नये.
पद्मासन करण्याची पध्दत
१ सरळ बसा.
२ डावा पाय दुमडून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
३ उजवा पाय दुमडून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
४ हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे बंद करुन ध्यानस्थ व्हा.
५ दहा मिनिटे याच स्थितीत राहा.
हे आहेत फायदे
१ ब्लडप्रेशन नियंत्रणात राहते.
२ मान आणि मणक्याचे हाड मजबूत होते.
३ मांड्या आणि पोटाची चरबी कमी होते.
४ मानसिक तणाव कमी होतो.