‘डिप्रेशन’ आणि ‘लठ्ठपणा’ला लावा पळवून, तिखट मिरची खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तिखट मिरची खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब असे त्रास होतात. तसेच मसालेदार पदार्थ नियमित खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते. काहींच्या शरीराला तिखट खाल्ल्याने सूज येते. परंतु, तिखट मिरची खाण्यामुळे फायदे सुद्धा होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
मजबूत हृदय
तिखट मिरचीमुळे शरीरातील कोलेस्टड्ढॉल कमी होते. तसेच मिरचीतील कॅप्सेसीन या घटकामुळे सुज येत नाही. संशोधनानूसार स्पायसी फूडमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
तणाव आणि डिप्रेशन
तिखट खाल्ल्याने शरीरातील सेरोटॉनिन हे हार्मोन वाढते. या हार्मोनमुळे चांगले वाटते व स्ट्रेस आणि डिप्रेशन कमी होते.
कँसर
मिरचीमध्ये मुबलक प्रमाणात कॅप्सेसीन नावाचे अल्कॉइड असते. कँसरच्या पेंशींना कमी करण्याचे काम हे अल्कॉइड करते.
वजन
तिखट खाल्ल्याने शरीरात जास्त चरबी साचत नाही. मसाल्यांमध्ये कॅलरीज नसतात. यामुळेच तिखट मिरची असणारे भोजन केल्याने तुम्ही लठ्ठ तर होत नाहीच. उलट लठ्ठपणा कमी होतो.
ब्लड प्रेशर
तिखटपणामुळे शरीरातील रक्तप्रवाह संतुलित राहतो. ह्रद्यातील रक्तप्रवाही सुरळीत राहतो. यामुळे ब्लड प्रेशरची समस्या कमी होते.
Comments are closed.