आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्याकडून नकळत होत असलेल्या काही चूकांमुळे मेंदूवर वाईट परिणाम होत असतो. स्मरणशक्ती कमी होणे, ब्रेन टिश्यूज डॅमेज होणे किंवा अल्जायमरसारखी समस्या यामुळे होते. मेंदू योग्य प्रकारे काम करत नाही. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी अशा चुका टाळल्या पाहिजे. या चुका कोणत्या याविषयी माहिती घेवूयात.
तीव्र आवाजात गाणी ऐकणे
सतत हेडवफोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने ब्रेन टिश्यूजवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे अल्जायमरची समस्या होऊ शकते.
धुम्रपान करणे
धुम्रपानामुळे शरीरात धोकादायक रसायने निर्माण होतात. यामुळे रक्त घट्ट होते, ज्यामुळे मेंदुला रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे ही समस्या होऊ शकते.
एकटे बसणे
जास्त वेळ एकटे बसणारांना अल्जायमरचा धोका वाढतो. याचा ब्रेनवर वाईट प्रभाव पडतो.
भरपूर झोप न घेणे
कमीत कमी ७ तासांची झोप न घेतल्याने ब्रेन फंक्शन्स योग्य प्रकारे काम करत नाही. वेळोसोबतच मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते.
जंक फूड
जंक फूडमध्ये एमएसजी नामक अडिटिव्ह असते. हे ब्रेनच्या न्यूरॉन रिसेप्टर्सला नुकसान पोहोचवते. कन्फ्यूजन, डोकेदुखी आणि वोमेटिंगसारखी समस्या होऊ शकते.