आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदलेली जीवनशैली, अयोग्य आहार, प्रदुषण आदी कारणांमुळे ह्रदयरोगाचा धोका वाढत चालला आहे. ही समस्या अतिशय गंभीर असून वेळीच काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हृदयविकारात अचानक व्यक्तीला दम लागून मृत्यू होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी कोणते पदार्थ खाणे टाळावे, याविषयी माहिती घेवूयात.
बाहेरील पदार्थ
फास्टफुड्स कधीही सेवन करू नका. मैदा आणि पॉलिश्ड राईस रिफाईन करताना यातील व्हिटॅमिन बी१ निघून जाते. त्यामुळे हे पदार्थ पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे ह्रदयरोगाचा धोका वाढतो.
थंडपेय
हे ह्रदयासाठी अतिशय घातक आहे. यामुळे रक्तातील शुगर लेव्हल फार वाढते. तसेच या पदार्थांमुळे डिप्रेशन हार्मोन्सही वाढतात. यामुळे मेंदू आणि ह्रदयरोगाचा धोका वाढतो.
कॉफी क्रिम आणि पॉपकॉर्न
कॉफी बनवण्यासाठी माग्र्राइनपासून बनवलेली क्रिम वापरणे धोकादायक ठरु शकते. या क्रिममध्ये ट्रान्स फॅट असते, जे अत्यंत हानिकारक असते.
मांसाहार करणे
जास्त मांसाहार करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात असते. ज्यांच्या अधिक सेवनाने धमन्या ब्लॉक होण्याची शक्यता असते व यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
तेलकट पदार्थ
तेलामध्ये तळलेल्या पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. यांच्या सेवनाने शरीरात गरजेपेक्षा जासत कॅलरीज फॅट्स जमा होतात.