आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेक चुकीच्या गोष्टी आपण रोज करतो. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. हा परिणाम ताबडतोब जाणवत नसला तरी कालांतराने याचे परिणाम जाणवू लागतात. टाइट जीन्स त्वचेला प्रेस करते तरीही फॅशनमध्ये राहण्यासाठी आपण टाइट जींस घालतो. यामुळे नर्व्हवर प्रेशर पडते. नर्व्ह सिस्टमवर परिणाम होतो. पायांमध्ये हवेचा फ्लो कमी होतो, ज्यामुळे पायांमध्ये खाज आणि मुंग्या येतात आणि नंतर पाय सुन्न होतात. अशाच काही अन्य चुकाही आपण दिवसभरात करत असतो. याबाबत माहिती घेवूयात.
१ जेवण केल्यानंतर तात्काळ ब्रश करु नका. जेवणाच्या कमीत कमी ३० मिनिट किंवा एक तासानंतर ब्रश करावा. जेवणाच्या तात्काळनंतर साध्या पाण्याने गुळण्या करु शकता.
२ शिंक आल्यावर ती थांबवू नका. शिंक थांबवली तर काही घातक पार्टीकल बॉडीमध्येच राहतात. शिंक रोखल्याने आतील दबाव वाढतो.
३ परफ्यूममध्ये सिंथेटिक तत्त्व असल्याने चक्कर येणे, मळमळने किंवा झोप येण्यासारख्या समस्या होऊ शकतात. डोळे, गळा आणि त्वचेवर इरिटेशन होते.
४ स्वस्त प्लास्टिक कंटेनरऐवजी ग्लास, स्टेनलेस स्टील किंवा सिरामिक मटेरियलने तयार केलेल्या कंटेनरमध्ये पदार्थ ठेवा.
५ अँटीबॅक्टेरियल सोपचा खुप जास्त यूज करत असाल त्वचेवरील चांगले बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात.