आरोग्यनामा ऑनलाइन टीम – यापूर्वी स्वाइन फ्लू हा आजार फक्त हिवाळ्यात जास्त प्रमाणात पसरत होता. परंतु, अलिकडच्या काळात या आजाराचे विषाणू कोणत्याही ऋतूमध्ये वाढू लागले आहेत. काही कालावधीपूर्वी या आजाराने पुणेसह राज्यात धुमाकूळ घातला होता. अतिशय जीवघेण्या अशा या आजाराची लागण होऊ नये म्हणून काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणा यासाठी प्रयत्नशिल असली तरी लोकांनीही काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे यावर अत्यंत सोपी घरगुती औषधे आहेत. ही औषधे घेतल्यास स्वाइन फ्लूच्या विषाणूची लागण टाळणे शक्य आहे.
हे उपाय करा
* कोरफडीचा एक चमचा गर रोज गरम पाण्याबरोबर घेतल्यास रोग प्रतिकारक क्षमता अत्यंत वेगाने वाढते. तसेच सांध्याच्या दुखण्यावरही प्रभावी उपचार होऊ शकतो.
* लसणाच्या दोन पाकळ्या रोज सकाळी कोमट पाण्याबरोबर सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते. स्वाइन फ्लूसारख्या आजारामध्ये रोग प्रतिकारक क्षमता ही सर्वात महत्त्वाची आहे.
* लहान गोळीच्या आकारातील कापुराच्या एका गोळीचे सेवन केल्यास त्याचाही स्वाइन फ्लूवर चांगला परिणाम दिसून येतो. पण त्याचे सेवन महिन्यातून एकदाच करावे.
* तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते. तसेच त्याच अँटि बॅक्टेरियल, अँटि फंगल तत्व असतात. त्यामुळे तुळशीची पाच स्वच्छ धुतलेली पाने रोज चावून खावीत.
* आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन सीयुक्त तत्वे असतात. त्यामुळे तेही स्वाइन फ्लुचा सामना करण्यात अधिक फायदेशीर ठरू शकतात.