कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कान हा आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे आपल्याला कानाची काळजी घ्यावी लागते. कारण कानदुखी हा खूप वेदनादायक आजार असतो. कानाचे वेगवेगळे आजारही असतात. यावर आपण काही घरगुती उपाय आपण करु शकतो. त्यामुळे आज जाणून घेऊया की कानांच्या वेगवेगळ्या समस्यांवर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो.
१) कान दुखी
तुमचा कान दुखत असल्यास तुम्ही तो गरम पाण्याच्या पिशवीने शेकावा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. काहीजण कान दुखत असेल तर कानात तेल घालतात. पण असं कधीच करू नका.
२) कानात काही गेल्यास
आपल्या कानात किटक, काडी वगैरे अशा गोष्टी गेल्यास त्यावर तुम्ही काही घरगुती उपचार करू नका. असं काही झाल्यास लगेच डॉक्टरांकडे जा. कारण कान हा आपल्या शरीराचा खूप नाजूक अवयव आहे. त्यामुळे कान कोरणे वगैरे असे प्रकार करून नये.
३) कान फुटणे
आपल्या नाकातल्या संसर्गामुळे काही वेळा स्त्राव कानावाटे बाहेर पडतो. त्यावर सर्दी बंद होईल असे काही घरगुती उपाय करावेत. सर्दी कमी झाल्यावर तुमची कानदुखी आपोआपच बरी होईल.
४) कानात मळ साठल्यास
तुमच्या कानात जर मळ साठला असेल तुम्ही कान शेकावा म्हणजे आतील मळ कोरडा होऊन आपोआप बाहेर पडेल. काही वेळा मात्र कानातील काही स्त्रावांमुणे मळ चिकटून बसतो. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून मळ काढावा.
५) कान चिघळणे
बरेच वेळा कानात डूल, दागिने घातल्याने अथवा कान टोचून घेतल्याने ते चिघळतात. त्यावर तेल लावावे. त्यामुळे चिघळणे बंद होते. कान फारच चिघळून तेथे संसर्ग होत असेल तर मात्र डॉक्टरी सल्याने इलाज करावेत.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)
Comments are closed.